BANNER

The Janshakti News

जात पडताळणी अभावी कोणतीही निवडणूक पुढे जाणार नाही आणि दर पाच वर्षांनी निवडणुका व्हाव्यात .....पदवीधर आमदार अरुणअण्णा लाड यांनी राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात केली मागणी.



=====================================
==============================


कुंडल : वार्ताहर                                 दि.२० जुलै २०२३

जात पडताळणीच्या कारणाने अनेक ग्रामपंचायतींच्या निवडणुका पुढे गेल्याने संबंधित गावांपुढील अडचणी वाढत आहेत यासाठी प्रत्येकाला कायमस्वरूपी जातपडताळणी प्रमाणपत्र द्यावे एकदा ते काढले की आयुष्यभर उपयोगात आणलं जावं यासाठी कायमस्वरूपी विधेयक मंजूर करावे, की जे ने करून जात पडताळणी अभावी कोणतीही निवडणूक पुढे जाणार नाही आणि दर पाच वर्षांनी निवडणुका व्हाव्यात. अशी मागणी पदवीधर आमदार अरुणअण्णा लाड यांनी मुंबई येथे सुरू असलेल्या राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात केली.


मुंबई येथे पावसाळी अधिवेशनात बोलताना आमदार अरुणअण्णा लाड.

आमदार लाड म्हणाले, अनेक मोठ्या ग्रामपंचायतींच्या मुदती संपून सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ झाला आहे. अशा ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्यासाठीही शासनाकडे कर्मचारी उपलब्ध नसल्याने एकाच व्यक्तीकडे अनेक गावे दिली जातात, यामुळे अतिरिक्त कार्यभार असल्याने त्या गावांचा विकास खुंटला आहे. सामान्यांची कामे होईनात, वार्डातील सदस्य नसल्याने वसुलीवर ही परिणाम झाला आहे यामुळे ग्रामपंचायतींचे अर्थकारण कोलमडले आहे.

यासाठी ईथुनपुढे कोणतीही निवडणूक पाच वर्षांतच व्हावी कसल्याही कारणाने ती पुढं ढकलली जाऊ नये असे झाले तर सामान्यांना बराचसा दिलासा मिळेल आणि गावगाढा ही चालवणे सोयीचे होईल.


आधारकार्ड, मतदान कार्डसारखा जातीचा दाखला प्रत्येक व्यक्तीसह विद्यार्थ्यांना ही द्यावा यामुळे शैक्षणिक कामात विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण येणार नाही.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆