BANNER

The Janshakti News

कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित करा. गेले सहा वर्षांपासून अधिक काळ एकाच ठिकाणी ठाण मांडून असणारे अधिकारी व कर्मचारी यांची बदली करा...

संजय कांबळे, जिल्हा संपर्कप्रमुख, वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन सांगली जिल्हा यांची मागणी.



वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनचे कामगारांच्या विविध मागण्यांचे निवेदन, कामगार मंत्री तथा पालकमंत्री मा.सुरेशभाऊ खाडे यांना देण्यात आले.

======================================
======================================

सांगली | दि.०६/०५/२०२३

वंचित शोषित,श्रमिक,कष्टकरी कामगार कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्कासाठी लढा देणारी एकमेव कामगार संघटना म्हणजेच,आद. ॲड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांची वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन सांगली जिल्हा संपर्कप्रमुख मा. संजय कांबळे यांच्या नेतृत्वाखाली श्रमिक कष्टकरी बांधकाम कामगारांच्या विविध मागण्यांचे निवेदन कामगार मंत्री तथा पालकमंत्री मा. सुरेशभाऊ खाडे यांना प्रत्यक्षात भेटून निवेदन देण्यात आले.निवेदनद्वारे कळविले की श्रमिक,कष्टकरी बांधकाम कामगारांना व त्यांच्या कुटुंबीयांच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक उन्नती व्हावी म्हणून महाराष्ट्र शासनाने इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ स्थापन केले असून त्या कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून बांधकाम कामगारांना विविध योजनांचा लाभ देण्यात येत आहे परंतु मंडळाकडे नोंदणीकृत असणारे बांधकाम कामगार हे मंडळाने आखून दिलेल्या वेबसाईट वरती जावून रितसर आपला अर्ज दाखल केल्यानंतर तो   अर्ज कामगारांच्या नावाने समाविष्ट होतो परंतु तो अर्ज प्रथम तपासणी करणारे मंडळाने नेमणूक केलेल्या MBOC ची अधिकृत आयडी असणारे काही क्लार्क हे कामगारांनी दाखल केलेली कागदपत्रे योग्य सुस्पष्ट असताना देखील केवळ अशिक्षित कामगारांना त्रास देण्याच्या दृष्टीने "दाखल केलेली कागदपत्रे अस्पष्ट आहेत" असा शेरा मारून पुढील असणारे अधिकारी इन्चार्ज व RO यांच्याकडे  पुढील कार्यवाही व कागदपत्रे तपासणी व पडताळणीसाठी पाठविण्यात आला असता तेही अधिकारी झिरो पेंडन्सी दाखवण्यासाठी क्लार्क ने टाकलेला रिमार्क जसाच्या तसा घेऊन पेस्ट करीत आहेत. यामुळे बांधकाम कामगारांचे कागदपत्रे योग्य असतांना मंजूर करण्यासाठी पात्र असतानाही निसकारण त्रूटी टाकून अपात्र करण्याचे काम सुरु झाले आहे. कामगार हा अशिक्षित असल्याने त्यांना   मंडळाच्या अधिकारी यांनी पाठविलेले शेरे वाचता येत नसल्याने ते अर्ज आठ दिवसांत रिजेक्ट होत आहेत. वास्तविक पाहता अर्ज तपासणी करणारे प्रथम क्लार्क यांनी जबाबदारीने काळजीपूर्वक    तपासून पुढे असणारे अधिकारी इन्चार्ज व RO यांच्याकडे पाठविणे आवश्यक असते परंतु तसे न करता मनमानी अंदाधुंदी कारभारामुळे कामगारांना त्रास व नुकसान सहन करावे लागत आहे. तसेच काही कामगारांचे अर्ज मंजूर असलेल्या कामगारांना आपली मुळ कागदपत्रे तपासणी करण्यासाठी घेऊन यावे असे ऑनलाईन शेरा मारून कळविले जात आहे. त्यामुळे मंजूर असताना बांधकाम कामगारांना परत नव्याने सर्व कागदपत्रे अपडेट करावी लागत आहेत. यामुळे परत त्यांचा अर्ज खालून वर येण्यास जवळपास पाच ते सहा महिने वाट पाहावी लागते. वास्तविक पाहता दाखल अर्जाची छाननी/कागदपत्रे तपासणी केल्यानंतर मंजूर असणारे कामगारांना मूळ कागदपत्रे तपासणी करण्यासाठी घेऊन यावे यासाठी फोन करून दोन दिवस कळवण्यात आले पाहिजे अथवा तसे मंडळाच्या ऑनलाईन वेबसाईट वर वेगळे प्रयोजन असणे आवश्यक व गरजेचे आहे. जेणेकरून त्या अर्जांची वेगळी यादी होईल व फेरतपासणी साठी सोईस्कर होईल असे नियोजन न करता कोणताही धोरणात्मक निकष न लावता विनाकारण अर्ज त्रूटी व रद्द करण्याचा सपाटाच सुरू केलेला आहे. यामुळे बांधकाम कामगारांना आपली कामे बुडवून वरचेवर कार्यालयात हेलपाटे मारावे लागत आहेत त्यामुळे कामगार हे  वैतागून गेले आहे.एक वेळ कामाला नाही गेल्यास त्यांची रोजची चुल पेटली जात नाही अशा खडतर परिस्थितीत आपले जिवन जगताना त्यांना हा अतिरेक ताण,मानसिक कुचंबणा व  आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. यामुळे बेशिस्तपणे मनमानी पद्धतीने कारभार करीत असणारे मंडळाचे कर्मचारी यांना निलंबित करण्यात यावे.तसे गेले दहा ते पंधरा वर्षांपूर्वी पासून एकाच जिल्ह्यात ठाण मांडून असणारे अधिकारी यांना शासन निर्णयानुसार ताबडतोब बदली करण्यात यावी व पारदर्शक कारभार सुरळीत पणे चालला जावा. तसेच बांधकाम कामगारांनी दाखल केलेली घरकुल योजनांचे अर्जाची छाननी करून अनुदान देण्यात यावे, तसेच बांधकाम कामगारांने दाखल केलेले सामाजिक लाभ व शैक्षणिक लाभ आणि वैद्यकीय उपचारासाठी मिळणारे लाभ तात्काळ मंजूर करण्यात यावे. तसेच तत्कालीन सहाय्यक कामगार आयुक्त  मा.अनिल गुरव साहेब यांच्या कारकिर्दीत श्रमिक कष्टकरी कामगारांचे प्रश्न वेळेस सोडवून मार्गी लावले आहेत. असे पारदर्शक कारभार सुरळीत कारभार पाहात असणारे श्रमिक कष्टकरी कामगार मित्र म्हणून जोपासनारे कर्तव्यदक्ष सद्या मुंबई येथे कामगार उपायुक्त म्हणून कार्यरत असणारे मा.अनिल गुरव साहेब यांची सांगली जिल्ह्यात कामगार सहाय्यक आयुक्त म्हणून पुन्हा नियुक्ती करण्यात यावी अशी आम्ही मागणी करीत आहोत. 


याचबरोबर इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ लागणारे कर्मचारी व अधिकारी यांची नेमणूक भरती प्रक्रिया वेळी नोंदणी कृत बांधकाम कामगारांना मंडळाच्या माध्यमातून शैक्षणिक अर्थसहाय्य मिळवून त्यांची मुले चांगल्या दर्जाचे शिक्षण घेतले मुले हे त्यांच्या शैक्षणिक पात्रता नुसार नोकरी भरती प्रक्रिया वेळी समाविष्ट करण्यासाठी मंत्री मंडळात ठराव मंजूर करून तसे परिपत्रक काढून भरती प्रक्रिया सुरू करण्यात यावी. बांधकाम कामगारांच्या मंडळात बांधकाम कामगारांची मुले अधिक कर्मचारी असा नव्याने आदर्श निर्माण करावा. तरी आपण सांगली जिल्ह्याचे सुपुत्र तसेच पालकमंत्री आणि महाराष्ट्र राज्य कामगार मंत्री या महत्त्वाच्या जिव्हाळ्याचा नाताने आपण आमच्या श्रमिक बांधकाम कामगार हिताच्या दृष्टीने मागण्या मान्य कराव्यात व श्रमिक कष्टकरी बांधकाम कामगारांच्या व त्यांच्या कुटुंबीयांच्या शुभेच्छा घ्याव्यात...
  
अन्यथा आम्हाला आद. ॲड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन सांगली जिल्हा मार्फत बांधकाम कामगारांच्या कल्याणासाठी न्याय हक्कासाठी लढा उभा करावा लागेल. यांची प्रामुख्याने नोंद घ्यावी. होणाऱ्या नुकसानीला महाराष्ट्र शासन व जिल्हा प्रशासन जबाबदार राहणार आहे असा इशारा देण्यात आला. 
यावेळी वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनचे पश्चिम महाराष्ट्र महासचिव मा.प्रशांतजी वाघमारे साहेब आवर्जून उपस्थित होते. यांच्या बरोबर सांगली जिल्हा महासचिव अनिल मोरे सर, जिल्हा कोषाध्यक्ष हिरामण भगत, उपाध्यक्ष सिध्दार्थ कांबळे,मनपा क्षेत्र उपाध्यक्ष महोन साबळे, मिरज तालुका अध्यक्ष इसाक सुतार,मिरज अध्यक्ष असलम मुल्ला, प्राजक्ता वाघमारे, सुनिता बाबर, दिपाली वाघमारे, विजय लांडगे, संदीप बाबर, रमेश कांबळे,संग्राम मोटकट्टे, अक्षय मोरे, आनंद कांबळे, रोहीत कांबळे, संगाप्पा शिंदे,मंजूनाथ कांबळे, बंदेनवाज राजरतन, प्रदिप मंचद, आकाश बनसोडे यांच्या सहीत बांधकाम कामगार आणि पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆