४५,०००/- रु.किंमतीचा मुद्देमाल जप्त करून आरोपीला केले जेरबंद..
======================================
======================================
भिलवडी : वार्ताहर
--------------------------------------------------------------------
भिलवडी (ता.पलूस) : भिलवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत व त्यांच्या टीमने केलेल्या कारवाईमध्ये रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार मधुकर यशवंत वायदंडे वय ३३ वर्षे रा.माळवाडी ता.पलूस हा भिलवडी पोलिसांच्या जाळ्यात सापडला आहे.
भिलवडी पोलीस ठाणे यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार ,
सुनील मारुती पाटील रा.भिलवडी ता.पलूस यांनी दि.१८/०४/२०२३ रोजी चोरीच्या घटनेबाबत अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता.
सदर आरोपींवर भिलवडी पोलीस ठाण्यात भादवि कलम ४५४, ४५७, ३८०, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल होता. या गुन्ह्याच्या अनुशंगाने तपास सुरू असताना भिलवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांना गोपनीय बातमीदारां कडून सदर आरोपीची माहिती मिळाली. सदर आरोपीला दि. ०५ / ०५ / २०२३ रोजी तपास कामे ताब्यात घेऊन त्याचेकडे सदर गुन्हयाच्या अनुशंगाने विचारपुस केली असता त्याने सर्व गुन्हयाची कबुली दिली. आरोपींकडून १५००/- रू. किमतीचे आयताकृती असलेली साधारण राखट पांढरे रंगाची बॅटरी , २५००/- रू. किमतीचे एक काटेरी कुंपणाचा लोखंडी तारेचे बंडल , १६,००० /- रू. किंमतीची एक बीपीएल कंपनीची एलसीडी टीव्ही ,२५,०००/- रू किंमतीचे सोन्याचे ६० पोकळ मणी असा एकूण ४५,०००/- रु.किंमतीचा मुद्देमाल जप्त करुन आरोपीला अटक केली आहे.
सदरची कारवाई, पोलीस अधिक्षक डॉ. बसवराज तेली , अपर पोलीस अधिक्षक तुषार पाटील (अतिरीक्त कार्यभार) व उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे मॅडम यांचे मार्गदर्शनाखाली
भिलवडी पोलीस ठाण्याचे सपोनि नितीन सावंत , सफौ माणीक मोरे , पोह महेश घस्ते , पोह चंद्रकांत कोळी , पोह मारूती मस्के , पोना तानाजी देवकुळे , पोशि विशाल पांगे , पोशि मंगेश गुरव यांनी केली आहे.
आरोपी मधुकर यशवंत वायदंडे याची गुन्हेगारी पार्श्वभूमी अशी आहे की, भिलवडी पोलीस ठाण्यात सदरचा आरोपी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असुन त्याचेवर यापुर्वी देखील ०५ गुन्हे दाखल आहेत.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆