BANNER

The Janshakti News

स्वाभिमानी ऊस तोडणी वाहतूक संघटनेचा आजरा शेतकरी सहकारी साखर कारखाना प्रशासनानाला दणका..ऊसतोडणी मजूरांसह जप्त करण्यात आलेला ऊस वाहतूक करणारा ट्रक दिला सोडून..




=============================


=============================

दिनांक 02/03/23 रोजी रात्री साडेनऊ वाजता आजरा शेतकरी सहकारी साखर कारखाना प्रशासनाने स्वाभिमानी ऊस तोडणी वाहतूक संघटनेच्या भूमिके मुळे नमते घेत श्री संतोष उमाजी पाटील या ऊस वाहतूक करणाऱ्या वाहन मालकाचा ट्रक तोडणी मजुरा सहित ॲडव्हान्स बाकी पोटी कारखाना प्रशासनाने जप्त करून कारखान्याच्या गोडाऊन मध्ये लावलेला होता तो सोडून द्यावा लागला. 



मा. श्री. राजू शेट्टी यांनी स्वाभिमानी ऊस तोडणी वाहतूक संघटनेला काय प्रकार आहे तो पाहून पुढील आदेश दिले त्यावेळी सुकाणू समितीचे प्रमुख शिलेदार कारखाना कार्यस्थळावर पोहोचले त्यावेळी ऊस वाहतुक दार संतोष उमाजी पाटील रा.पंडीवरे तालुका भुदरगड या वाहन मालकाचा सदर कारखान्यास दोन वाहनांचा तोडणी मजुरांसहित करार होता यांच कारखान्यास काम करून सुद्धा अंशत: येणे बाकी पोटी आजरा शेतकरी सहकारी साखर कारखाना प्रशासनाने ट्रक मुजरा सहित कारखान्याच्या ताब्यात घेतला होता. 


ऊस वाहतूक संघटनेच्या वतीने मा.श्री संदीप राजोबा यांनी निवेदन देताना हा प्रकार पूर्णपणे चुकीचा असून हे कोणत्याच कायद्यात बसत नाही कारण साखर उद्योग हा महाराष्ट्रातल्या अर्थकारणाला दिशा देणारा उद्योग असून शेतकरी हा केंद्रबिंदू मानून शेतकऱ्यांच्या बरोबर साखर कारखाने सुद्धा टिकले पाहिजेत व शेतकरी व साखर कारखाना यांच्यामधील दुवा म्हणून तोडणी वाहतूकदार हा महत्त्वाचा घटक आहे तोही टिकला पाहिजे कारखाना प्रशासनाने यांना ताब्यात ठेवल्यानंतर मजूर त्यातूनही पळून गेले किंवा एखादा दुर्दैवी प्रकार घडला तर ही जबाबदारी सर्वस्वी कारखाना प्रशासनाची आहे. सदर वाहन मालकाला हप्ते पाडून द्यावेत किंवा टोळीकडून पैसे वसूल झाल्यानंतर भरण्याची मुभा द्यावी नसेल तर आम्हाला आमच्या पद्धतीने जावे लागेल अशी भूमिका घेतल्यानंतर सदरचा ट्रक टोळी सहित सोडून देण्यात आला.




 सदर ऊस वाहतूक दारास उर्वरित रक्कम काम करून पुढील वर्षी फेडणेस मंजुरी दिली यावेळी प्रवीण शेट्टी, दिग्विजय जगदाळे, विद्यासागर पाटील यांनी कारखाना प्रशासनाला धारेवर धरले यावेळी कारखान्याच्या वतीने संचालक तानाजी देसाई व कार्यकारी संचालक एटी भोसले यांनी निवेदन स्वीकारले व चर्चेअंती निर्णय घेतला स्वाभिमानी तोडणी वाहतूक संघटनेने सर्व वाहतूकदारांना घटनेच्या माध्यमातून एकत्र केल्यामुळे हे यश प्राप्त झाले आहे इथून पुढच्या काळात कारखान्याने सुद्धा नोंदणीकृत ऊस तोडणी मुकदम व मजुरांच्या बरोबरच करार करावा असे कारखाना प्रशासनास सांगितले.



 स्वाभिमानी ऊस वाहतुकदांराच्या न्याय हक्कासाठी हा लढा आणखीन तीव्र करू असे संदीप राजोबा म्हणाले यावेळी विठ्ठल पाटील, शिवाजी पाटील, धन्यकुमार पाटील, स्वप्निल पुजारी, नेताजी पाटील, सुभाष मांडे, सोहेल नायकवडे, बाजीराव नारे, पंढरीनाथ पाटील इत्यादी ऊस वाहतूकदार यावेळी उपस्थित होते.
◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆◆◆●◆●◆●◆●



◆●◆●◆●◆●◆●◆●◆◆◆◆◆●◆◆◆●◆●