BANNER

The Janshakti News

माध्यमिक विद्यालय नागठाणे येथे माजी विद्यार्थी स्नेह मेळावा व वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न..




======================================
======================================

भिलवडी | दि. 05 जानेवारी 2023

 नागठाणे ता.पलूस येथील  माध्यमिक विद्यालयातील माजी विद्यार्थांचा स्नेह मेळावा व शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झाले.  कार्यक्रमाचे अध्यक्ष क्रांती उद्योग समूहाचे मा. श्री विक्रांत भैय्या लाड हे होते. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक श्री. सुभाष कवडे सर हे लाभले. 


माजी विद्यार्थी स्नेह मेळावा या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. विक्रांत भैया लाड यांचा सत्कार संस्थेचे संस्थेचे संचालक मा. श्री.दिलीप आप्पा कुलकर्णी यांच्या हस्ते घेण्यात आला .तसेच प्राध्यापक श्री कवडे सर यांचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष श्री कुमार शिंदे दादा यांच्या हस्ते करण्यात आला त्याचबरोबर हूबालवाडी ग्रामपंचायतच्या लोकनियुक्त सरपंच सौ. मंगलताई हुबाले यांचा सत्कार मा. श्री भिकाजी साळुंखे-पाटील बापू यांच्या हस्ते करण्यात आला हुतात्मा बँकेच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल बाजीराव मांगलेकर नाना यांचा सत्कार विद्यालयातर्फे घेण्यात आला  संस्थेस दहा हजार रुपये देणगी आनंदराव कोरे सर यांनी दिली त्याबद्दल त्यांचाही सत्कार घेण्यात आला विद्यालयाचा माजी विद्यार्थी व अंबक गावच्या लोकनियुक्त सरपंच सौ.दीप्ती सूर्यवंशी यांचा सत्कार संस्थेचे सदस्य श्री. पंढरीनाथ जाधव यांच्या हस्ते करण्यात आला.


 तसेच नागठाणे गावच्या सरपंच सौ दिपाली माने यांचा सत्कार विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती. मंजुषा पवार मॅडम यांच्या हस्ते करण्यात आला विद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी व तुजारपूर ग्रामपंचायत सदस्य सौ. राजश्री पाटील यांचा सत्कार संस्थेचे सदस्य श्री. आप्पासाहेब सूर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आला या कार्यक्रमासाठी महान महाराष्ट्र केसरी पैलवान विजय पाटील व भारतीय जनता पार्टीचे पलूस तालुका अध्यक्ष विजय काका पाटील हे उपस्थित होते या कार्यक्रमासाठी माजी विद्यार्थी बहुसंख्येने हजर होते. तसेच शाळेसाठी विद्यार्थ्यांनी  बहुमूल्य वस्तू स्वरूपात व रोख रक्कम स्वरूपात भेटवस्तू दिल्या व विद्यालयाच्या आठवणींना उजाळा दिला. व विद्यालयामध्ये माजी विद्यार्थी व सर्व उपस्थित मान्यवरांनी स्नेह भोजनाचा आस्वाद घेतला. या कार्यक्रमाचे आभार सांस्कृतिक प्रमुख श्रीमती वावरे मॅडम यांनी मांडले तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इजारे मॅडम यांनी केले. या कार्यक्रमासाठी विद्यालयातील सर्व कर्मचारी वृंदांचे सहकार्य लाभले.
------------------------------------------------------


◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆


◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆