BANNER

The Janshakti News

परिवर्तनासाठी समाजाने उघड्या डोळ्यांनी चळवळ स्वीकारण्याची गरज.. राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष प्रा. सुभाष वायदंडे यांचे प्रतिपादन..


       
       ➡️                        *व्हिडीओ पहा*
                                               👇


=====================================
=====================================

बार्शी | दि. २७ जानेवारी २०२३

बार्शी:-[ उपळाई ठोंगे ]- आज पर्यंत फुले, शाहू, आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारांच्या अनेक चळवळी जन्माला आल्या चळवळीतून नेत्यांनी समाजाला प्रबोधित करता ,करता स्वतःचा विकास करून घेतला परंतु  समाजाचं आर्थिक ,शैक्षणिक परिवर्तन  झालं का? समाज आहे त्याच ठिकाणी आहे हे ओळखून समाजानं उघड्या डोळ्यांनी चळवळ स्वीकारण्याची गरज आहे तरच सामाजिक परिवर्तन होईल असे प्रतिपादन पुरोगामी संघर्ष परिषदेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष प्रा. सुभाष वायदंडे यांनी केले ते उपळाई ठोंगे ( ता.बार्शी)येथे संघटनेच्या नामफलकाचे अनावरण प्रसंगी बोलत होते.
पुढे बोलताना प्रा वायदंडे म्हणाले समाजावर अन्याय करणाऱ्या ठिकाणात बदल झाल्यामुळे अन्यायाचा प्रकार ही बदलला आहे हे समाजाने जागृत राहून समजून घेतलं पाहिजे.
यावेळी राज्य प्रवक्ता पांडुरंग रणदिवे बोलताना म्हणाले सामाजिक चळवळीनी जरी रंग बदलला तरी पुरोगामी विचारांच्या चळवळी जपल्या पाहिजेत.


स्वागत  पुरोगामी संघर्ष परिषदेचे बार्शी ग्रामीण तालुकाअध्यक्ष ज्ञानेश्वर कांबळे यांनी केले तर  प्रास्ताविक पुरोगामी संघर्ष परिषदेचे वरिष्ठ तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर कांबळे यांनी केले.
यावेळी प्रमुख उपस्थितीत पुरोगामी संघर्ष परिषदेचे वरिष्ठ राज्य उपाध्यक्ष नेताजीराव अवघडे, युवक राज्य उपाध्यक्ष अंकुश भोंडे, सोलापूर वरिष्ठ जिल्हाध्यक्ष कृष्णाजी गायकवाड, उपळाई ठोंगे गावचे सरपंच बापूसाहेब ठोंगे, महिला आघाडीच्या सोलापूर जिल्हा अध्यक्षा ज्योतीताई अवघडे, सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख अनंद ढावारे,पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस खंडू कांबळे ,पश्चिम महाराष्ट्र युवती अध्यक्षा संगीता भोंडे, पुणे जिल्हा अध्यक्षा प्रियांका कांबळे इत्यादी पुरोगामी संघर्ष परिषदेचे पदाधिकारी उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे नियोजन जीवन कांबळे,सागर कांबळे, केशव कांबळे, राजेश कांबळे, बालाजी कांबळे, दादासाहेब जाधव, शाखाप्रमुख जयसिंग कांबळे, समाधान कांबळे, बापू तोरडमल, विठ्ठल जाधव, नवनाथ कदम, पप्पू कांबळे, कुणाल कांबळे, दिनेश कांबळे ,रघुनाथ कांबळे, दादासाहेब कांबळे, ज्ञानेश्वर कांबळे, अभिषेक कांबळे, गोकुळ कांबळे, गणेश थोरात, नारायण कांबळे, लक्ष्मण ढावारे,श्रीमंत कांबळे, शिवाजी कांबळे, विठोबा कांबळे, भीमा कांबळे, अजिनाथ कांबळे, हिरामण कांबळे,इत्यादी पुरोगामी संघर्ष परिषदेच्या शाखा पदाधिकाऱ्यांनी केले.
शेवटी आभार पुरोगामी संघर्ष परिषदेचे सोलापूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष शंकर कांबळे यांनी मानले.

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆


◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆