BANNER

The Janshakti News

आंधळी येथे दोस्ती नवरात्र मंडळाच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन...

आंधळी येथे दोस्ती नवरात्र मंडळाच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन...

मा.राज्यमंत्री डॉ विश्वजित कदम यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन...

======================================


======================================

पलूस | दि. ४ ऑक्टोबर २०२२

पलूस : तालुक्यातील आंधळी येथे आज मंगळवार दि. ०४ ऑक्टोबर रोजी सकाळी ९:०० ते सांयकाळी ५:०० पर्यंत नवरात्रोत्सवानिमित्त दोस्ती  नवरात्र मंडळाच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

या शिबिरात गावातील जास्तीत जास्त नागरिकांनी रक्तदान करून सामाजिक बांधीलकी जपावी असे आवाहन आंधळी (जगदाळे गल्ली) येथील दोस्ती  नवरात्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
 
नवरात्रोत्सवाचे हे २५ वे वर्ष आहे. 

नवरात्र उत्सवानिमित्त मंडळातर्फे दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येतात. यावर्षीही धार्मिक कार्यक्रमांसह सामाजिक, सांस्कृतिक, मनोरंजनाचे कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 


पलूस - कडेगाव विधानसभा मतदारसंघाचे लाडके आमदार  मा. राज्यमंत्री  डॉ. विश्वजीत कदम यांच्या हस्ते शिबिराचे उद्घघाटन करून शिबिराला सुरुवात करण्यात आली. यावेळी  पलूस तालुक्यातील अनेक मान्यवर मंडळी व आंधळी गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆