BANNER

The Janshakti News

CRIME NEWS - कडेगाव तहसीलदार कार्यालयातील अव्वल कारकून ACB च्या जाळ्यात.. १०,०००/- रुपये लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले...==========================================================================

सांगली | दि.१४ सप्टेंबर २०२२

सांगली जिल्ह्यातील लोकसेवक श्री सुनिल दादासो चहाण, वय ४९ वर्ष, अव्वल कारकून,
तहसिलदार कार्यालय कडेगांव रा. अण्णाभाऊ साठेनगर, इस्लामपूर ता.वाळवा जि. सांगली यांना १०,०००/- रूपये लाच रक्कम स्विकारत असताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सांगली यांनी रंगेहाथ पकडले.


लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सांगली यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदार यांनी शेत जमीनीमधून जाणे येणेसाठी गाडी रस्ता मंजूर करून देण्याबाबत तहसिलदार कार्यालय कडेगांव या ठिकाणी अर्ज दाखल केला होता. त्याप्रमाणे कडेगांव तहसिलदार कार्यालयात सुनावणी सुरू होती. तसेच तक्रारदार यांचे शेतजमीनीच्या ७/१२ उताऱ्यावरील कुळकायदा कलम ४३ शर्त कमी करणेबाबत तक्रारदार यांनी तहसिलदार कार्यालय कडेगाव यांच्याकडे अर्ज केला होता. सदर दोन्ही कामामध्ये मदत करण्यासाठी अव्वल कारकून सुनील चव्हाण यांनी तक्रारदारांकडे १५,०००/- रूपये लाचेची मागणी केली असल्याबाबतच्या तक्रारी अर्ज तक्रारदार यांनी दि.१२.०९.२०२२ रोजी अन्टी करप्शन ब्युरो सांगली पथकास दिला होता.


तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दिनांक १२.०९.२०२२ रोजी ब्यूरोच्या कार्यप्रणालीप्रमाणे पडताळणी केली असता त्यामध्ये लोकसेवक श्री.सुनील चव्हाण, अव्वल कारकून यांनी तक्रारदार यांच्या दोन्ही कामामध्ये मदत करण्यासाठी प्रथम १५,०००/- रूपये लाचेची मागणी करून चर्चेअंती १०,०००/- रुपये लाचेची मागणी केली असल्याचे निष्पन्न झाले होते. 
त्यानंतर दि.१३.०९.२०२२ रोजी अँटी करप्शन ब्युरो सांगली यांनी तहसिलदार कार्यालय कडेगाव या ठिकाणी सापळा लावला असता लोकसेवक चव्हाण यांनी तक्रारदार यांचेकडे लाचेची मागणी करून १०,०००/- रूपये तक्रारदार यांचेकडून स्विकारले नंतर त्यांना अँटी करप्शन ब्युरो सांगलीच्या पथकाने रंगेहात पकडले आहे.


या अनुषंगाने लाचखोर लोकसेवक श्री. सुनिल दादासो चहाण यांच्या विरोधात कडेगांव पोलीस ठाण्यात लालुपत प्रतिबंधक अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हि कारवाई अँन्टी करप्शन ब्युरो सांगली चे पोलीस उपअधीक्षक - सुजय घाटगे , पोलीस निरीक्षक - विनायक भिलारे, पोलीस निरीक्षक
दत्तात्रय पुजारी पोलीस अंमलदार अविनाश सागर, सलीम मकानदार, सिमा माने, संजय संकपाळ, धनंजय खाडे, प्रितम चौगुले, रविंद्र धुमाळ, संजय कलकुटगी यांनी केली आहे.

●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●