======================================
======================================
वसगडे | दि. १३ ऑगस्ट २०२२
वसगडे ता.पलूस येथे दि.१२ऑगस्ट२०२२ रोजी जयभारत विद्यालय वसगडे येथे
आजादी का अमृतमहोत्सव निमित्त आयोजित विविध कार्यक्रमा अंतर्गत मोबाईलच्या अतिवापराचे दुष्परिणाम ह्या विषयावर तरुण पिढीला डॉ. प्रवीण कोडग ,वैद्यकीय अधिकारी, वसगडे यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी बोलताना डॉ. कोडग म्हणाले की, मानवाने आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून आपले नियमित जीवन सुकर व्हावे ह्याकरता अनेक आधुनिक उपकरणे तयार केली त्यांपैकीं एक म्हणजे मोबाईल.
दुरवरील आपल्या माणसांशी कधीही कुठेही संवाद साधण्यासाठी तयार करण्यात आलेले एक साधन.
वेळेनुसार त्यात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अनेक सोयी उपलब्ध करून देण्यात आल्या.
सोशल मीडिया , विविध प्रकारचे गेम्स् ह्यामुळे मोबाईल चा प्रमाणापेक्षा अधिक वापर होऊ लागला.
परिणामी मोबाईलच्या अतिवापरामुळे घरात असून ही आपल्या लोकांतील मुक्त संवाद हरपला. त्यामुळे एकाकीपणा येऊ लागला
मोबाईल च्या अतिवापराच्या सवयीमुळे रात्रीची झोप उडाली व निद्रानाशाने गाठले.
नियमित एकटक पाहणे व शुभ्र प्रकाशामुळे डोळ्यांचे आजार वाढू लागले. सायबर क्राईम मध्ये वाढ होऊ लागली.मोबाईलचा डेटा आधीक लागू लागल्याने पैश्याचा अपव्यय वाढला तसेच ,कॅन्सर, carpel tunnel सिन्ड्रोम ,मानसिक आजार असे दुष्परिणाम अतिवापरामुळे बळावू लागलेत
म्हणून मोबाईलचा अतिवापर टाळण्यासाठी
नियमित पुस्तक वाचनाची सवयी लावावी ,
बाहेर फिरणे , वेळेवर जेवण करणे , गाणे, डान्स इ मध्ये स्वतःला व्यस्त ठेवणे,
जास्तीत जास्त दिवसभरात 4 तास च मोबाईल चा वापर करणे म्हणजे वरील होणाऱ्या दुष्परिणामा पासून आपण सुरक्षित राहु
ह्या कार्यक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक राजोबा सर , मा संपतराव पवार , वसगडे गावचे उपसरपंच , डॉ. सचिन मगदूम व समुदाय आरोग्य अधिकारी व राहुल कांबळे आरोग्य सेवक आरोग्यवर्धनी उपकेंद्र खटाव , शाळेतील सर्व शिक्षक वर्ग उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी अंमली पदार्थ विरोधी प्रतिज्ञा घेण्यात आली.