BANNER

The Janshakti News

भिलवडी येथे जेष्ठ समाजसेविका स्व.डॉ.चंद्राताई शेणोलीकर यांना अभिवादन..======================================


======================================भिलवडी | दि. १६ जुलै २०२२

भिलवडी शिक्षण संस्थेच्या मैदानावर असलेल्या समाधीस्थळी थोर समाजसेविका स्व.डॉ. चंद्राताई शेणोलीकर यांच्या २७ व्या स्मृतिदिनानिमित्त मान्यवरांनी अभिवादन केले. 
 
स्व. डॉ. चंद्राताई शेणोलीकर यांनी  त्याग,संस्कार आणि प्रामाणिकपणे शिक्षण, समाज व आरोग्यसेवेमध्ये अध्यात्म शोधले. शेणोलीकर यांचे जीवनचरित्र हे आदर्श जीवनाचा वस्तुपाठ असल्याचे प्रतिपादन डॉ. शंतनू कुलकर्णी (सुप्रसिद्ध सर्जन कराड) यांनी केले.
ज्येष्ठ समाजसेविका व भिलवडी शिक्षण संस्थेच्या माजी अध्यक्षा स्व. डॉ.चंद्राताई शेणोलीकर यांच्या २७ व्या स्मृतिदिनी आयोजित प्राचीन भारतातील गुरुशिष्य परंपरा या विषयावरील प्रवचन प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी भिलवडी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विश्वास चितळे होते.
मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते स्व. डॉ.शेणोलीकर  यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.भिलवडी शिक्षण संकुलात शेणोलीकर यांच्या समाधी परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
यापुढे बोलताना, 
डॉ.शंतनू कुलकर्णी म्हणाले की,प्राचीन भारतातील गुरुशिष्य परंपरेत प्रसिद्ध अशा जोडया आहेत.शिष्याच्या कर्तृत्वावर गुरूंचे श्रेष्ठत्व सिद्ध झाले आहे.शिष्य कमी पडल्याची जबाबदारी घेणारे गुरू आणि गुरुवर श्रद्धा असणारे शिष्य असे गुरुशिष्याचे नाते होते.ती परंपरा पुढे सातत्याने जोपासण्याची जबाबदारी गुरुजन आणि विद्यार्थ्यांनी घ्यावी.
स्व. डॉ.चंद्राताई शेणोलीकर स्मृती जिल्हास्तरीय स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.
भिलवडी शिक्षण
संस्था सचिव मानसिंग हाके यांनी प्रास्ताविक व स्वागत केले.प्राचार्य डॉ.दिपक देशपांडे यांनी पाहुणे परिचय यांनी केला.सहसचिव के.डी.पाटील यांनी सूत्रसंचालन केले.प्रा.डॉ.एम.
आर.पाटील यांनी आभार मानले.
यावेळी संस्थेचे विश्वस्त जे.बी.चौगुले,संचालक प्रा.आर. डी.पाटील,व्यंकोजी जाधव,  भू.ना.मगदूम,खंडू आण्णा शेटे,रविंद्र यादव,माजी प्राचार्य डॉ. प्रकाश कुलकर्णी,सेकंडरी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज भिलवडीचे मुख्याध्यापक संजय कुलकर्णी, संभाजी माने,सुकुमार किणीकर,विद्या टोणपे,स्मिता माने,सुचेता कुलकर्णी
 आदींसह शिक्षक,पालक,नागरिक उपस्थित होते.
  स्व. डॉ.चंद्राताई शेणोलीकर स्मृती जिल्हास्तरीय स्पर्धेच्या पारितोषिक वितरण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उज्वला हजारे,संजय पाटील, यांनी केले.रचना सत्याण्णा हिने पसायदान गायले तिला सौ.प्राजक्ता कुलकर्णी यांनी हार्मोनियम साथ दिली.

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆