BANNER

The Janshakti News

भिलवडी येथील खाजगी मराठी प्राथमिक शाळेत नवागतांचे स्वागत व पाठ्यपुस्तक वितरण कार्यक्रम संपन्न..



भिलवडी येथील खाजगी मराठी प्राथमिक शाळेत  नवागतांचे स्वागत व पाठ्यपुस्तक वितरण कार्यक्रम संपन्न..

======================================


======================================

भिलवडी | दि. 17/06/2022

भिलवडी शिक्षण संस्थेच्या खाजगी मराठी प्राथमिक शाळा भिलवडी येथे नवागताचे स्वागत,मोफत पाठ्यपुस्तके वितरण कार्यक्रम संपन्न झाला.
प्राथमिक विभाग प्रा.सौ.मनिषा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत व भिलवडी शिक्षण संस्थेचे सचिव मानसिंग हाके यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम संपन्न झाला.शाळेत प्रवेश घेतलेल्या इयत्ता पहली मधील विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प व पेन्सिल देऊन स्वागत करण्यात आले.सर्व विद्यार्थ्यांना शासनाच्या वतीने देण्यात आलेल्या पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले.सांगली शिक्षण संस्थेच्या वतीने सन २०२१ - २०२२ या शैक्षणिक वर्षात घेण्यात आलेल्या गुणवत्ता शोध (T.S.E.) व शताब्दी परीक्षेत राज्य व जिलहस्तरिय गुणवत्ता यादीत विशेष गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते अभिनंदन पर सत्कार  
करण्यात आला. 

 
यावेळी बोलताना सचिव मानसिंग हाके म्हणाले की  खाजगी मराठी शाळेने इयत्ता पहिलीपासून विद्यार्थ्यांची स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी स्वतःचा पॅटर्न तयार केला आहे.निश्चितच शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी त्याचा उपयोग होत असल्याचे मनोगत व्यक्त करून त्यांनी गुणवंत विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले.प्रा.सौ.मनिषा पाटील यांनी सर्व विद्यार्थी,पालक व शिक्षकांना चालू शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा दिल्या.

मुख्याध्यापक सुकुमार किणीकर यांनी प्रास्ताविक व स्वागत केले.संजय पाटील यांनी सूत्रसंचालन केले.सौ.छाया गायकवाड यांनी आभार मानले.यावेळी संध्यारानी भिंगारदिवे,प्रगती भोसले,शरद जाधव,विठ्ठल खुटाण,वर्षा
कोळी,अर्चना येसुगडे,किरण गुरव,सफुरा पठाण,सौ.शेख,
स्वाती भोळे,सौ.कोळी,सौ.पटेल आदी शिक्षकांसह पालक उपस्थित होते.

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆




◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆