BANNER

The Janshakti News

उद्या ता. २ एप्रिल रोजी सुभाष कवड़े यांच्या " हिरवी हिरवी झाडे " या पुस्तकाचे प्रकाशन...



उद्या ता. २ एप्रिल रोजी सुभाष कवड़े यांच्या    " हिरवी हिरवी झाडे " या पुस्तकाचे प्रकाशन... 


======================================


======================================

भिलवडी | ता. ०१/०४/ २०२२

सुप्रसिद्ध साहित्यिक,कवी व वक्ते सुभाष कवडे लिखित हिरवी हिरवी झाडे या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा शनिवार दिनांक २ एप्रिल रोजी संपन्न होत आहे.
भिलवडी सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष व उद्योगपती गिरीश चितळे यांच्या अध्यक्षतेखाली गुढीपाडव्यानिमित्त वाचक सभासद मेळावा आयोजित केला आहे.वाचनालयाचे माजी अध्यक्ष स्व.डॉ. वा. ग.गोसावी व स्व.काकासाहेब चितळे यांच्या प्रेरणेतून गेली वीस वर्षे गुढीपाडव्यानिमित्त वाचक सभासद मेळावा आयोजित केला जात आहे.
हिरवी हिरवी झाडे हे सुभाष कवडे यांनी लिहिलेले तेरावे पुस्तक आहे.
गिरीश चितळे यांच्या हस्ते हिरवी हिरवी झाडे या बालकविता संग्रहाचे प्रकाशन करण्यात येणार आहे.
हास्ययात्राकार शरद जाधव पुस्तकाचा परिचय करून देणार आहेत.भिलवडी गावचे सुपुत्र व सांगली जिल्हापरिषदेचे प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांचा सत्कार करण्यात येणार आहे.यावेळी वाचन कट्टा,वाचक मेळावा,देणगीदार सत्कार आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.शनिवार दिनांक २ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वा.आयोजित मेळाव्यास वाचक सभासदांनी उपस्थित राहावे असे आवाहन कार्यवाह सुभाष कवडे यांनी केले आहे.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆


◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆



◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆