महिलेला पिस्तुलीचा धाक दाखवून जिवे मारण्याची धमकी....
गेवराई तालुक्यातील संगम जळगाव येथील घटना...
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
गेवराई | दि. २८/०३/२०२२
बिड जिल्हा प्रतिनिधी - बाळराजे जाधव
गेवराई - तालुक्यातील संगम जळगाव येथील ऊसतोड मजुरांना ऊसतोडणी करण्यास मज्जाव करणाऱ्यास जाब विचारण्यास गेलेल्या फिर्यादीस शिवीगाळ करत पिस्तुल लावण्याची घटना घडली असुन या प्रकरणी गेवराई पोलीसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की फिर्यादी सविता संतोष गर्जे यांच्या शेतामध्ये ऊसतोडणी करणारे मजुरांची टोळी आली असता आरोपी यशवंत प्रभाकर नागरे यांनी सदरील शेताचा वाद कोर्टात सुरू असुन तुम्ही ऊसतोडणी करू शकत नाही असं म्हणत फिर्यादी सविता संतोष गर्जे यांना शिवीगाळ करत त्यांना पिस्तुलीचा धाक दाखवून जिवे मारण्याची घटना घडली आहे. याप्रकरणी फिर्यादी सविता गर्जे यांच्या फिर्यादीवरून आरोपी यशवंत प्रभाकर नागरे, शिल्पा यशवंत नागरे, प्रभागर यशवंत नागरे यांच्याविरोधात कलम ३२४,३४१,५०४,५०६, ३४ भांदवी सह कलम ३/२५ भा. ह. का. प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली असुन पुढील तपास स.पो. उबाळे करत आहेत.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆