BANNER

The Janshakti News

आजार निमंत्रण देऊन येत नाही..उत्तम आरोग्यासाठी पूर्व काळजी गरजेची.. सौ. स्मिता पाटील (ग.वि.आ.पलूस)



आजार निमंत्रण देऊन येत नाही..उत्तम आरोग्यासाठी पूर्व काळजी गरजेची..     
             
              सौ. स्मिता पाटील (ग.वि.आ.पलूस)

====================================
====================================

पलूस | दि. २४ / ०३ /२०२२

कुंडल तालुका पलूस येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात लोकनेते राजारामबापू पाटील स्मृति  आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते.
या प्रसंगी पलूस पंचायत समितीच्या  गट विकास अधिकारी सौ. स्मिता पाटील, पलुस तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. रागीनी पवार, पलूस पंचायत समितीचे उपसभापती अरुण पापा पवार, कुंडलच्या सरपंच सौ. प्रमिलाताई पुजारी, रणसंग्राम सोशल फाउंडेशन चे अध्यक्ष ॲड. दिपक लाड, पोपटराव सूर्यवंशी. कुंडल प्रा. आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. किरण गोरे, डॉ. अक्षय पाटील, डॉ. महावीर पाटील, डॉ. किरण गोतपागर,डॉ. गोरे यांच्यासह निमंत्रित डॉक्टर व कुंडल प्राथमिक आरोग्य केंद्राच्या संलग्नित सर्व आशा सेविका भगिनी व कुंडल येथील नागरिक उपस्थित होते..


यावेळी पलुस तालुका गट विकास अधिकारी सौ. स्मिता पाटील म्हणाल्या.. आरोग्य शिबिराचा लाभ सर्वसामान्य रुग्णांना होत असतो.. नागरिकांनी याचा लाभ घ्यायला हवा.. कोणताही आजार निमंत्रण देऊन येत नाही, आरोग्याची जास्तीत जास्ती काळजी घेऊन सदृढ राहणे फायदेशीर ठरेल
असे विचार  सौ स्मिता पाटील यांनी व्यक्त केले..


 कोरोनाच्या महामारीमुळे जग हादरून गेले होते, संकट समयी
अत्यंत धीरोदात्तपणे आरोग्य विभागातील डॉक्टर्स ,आशा सेविका सर्व घटकांनी जे काम केले आहे.. ते काम जगातील सर्वोत्कृष्ट कार्य आहे, पुढील काळात आपल्या आरोग्याच्या दृष्टीने प्रत्येक नागरिकांनी सतर्क राहायला हवे असे आवाहन सौ. स्मिता पाटील यांनी केले...

पलूस पंचायत समितीचे उपसभापती अरुण पापा पवार म्हणाले कोरोना तसेच महापुरा सारख्या संकटामध्ये तालुका पंचायत समिती प्रशासन नेहमीच आरोग्य विभागाच्या सोबत आहे.. 

आरोग्य सेवेबाबत कोणतेही आव्हान असू आम्ही एक पाऊल पुढे असणार असे मनोगत अरुण पापा पवार यांनी व्यक्त केले..


कुंडल गावच्या प्रथम नागरिक लोकनियुक्त सरपंच सौ. प्रमिला पुजारी म्हणाल्या आरोग्य शिबिरांचे आयोजन गरजू व गरीब माणसांच्या आरोग्य सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत चांगले सेवाभावी कार्य आहे. 
लोकांचे आरोग्य चांगले असेल तरच समाज आनंदी असेल
 तसेच  कुंडल ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पुरवल्या जाणाऱ्या सेवा व सुविधा बाबत , व जलजागृती बाबत सरपंच प्रमिलाताई पुजारी यांनी मनोगत व्यक्त करताना माहिती दिली..

कोरोणा काळात उल्लेखनीय कार्य केलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्र कुंडल सर्व स्टेप व वैद्यकीय अधिकारी डॉ किरण भोरे व सर्व यंत्रणेचे कौतुक केले.


समाजाच्या चांगल्या आरोग्यासाठी, गरजू रुग्णापर्यंत पोहोचण्यासाठी निर्माण केलेले व्यासपीठ म्हणजे आरोग्य शिबीर असे विचार ॲड.  दिपक लाड यांनी मनोगतातून व्यक्त केले.

डॉ किरण गोतपागर यांनी स्वागत व प्रस्ताविक मनोगतामधून आरोग्य जनजागृती व नागरिकांचे आरोग्याच्या दृष्टीने शासनाच्या आरोग्य सुविधा बाबत सखोल मार्गदर्शन केले..


◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆



◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆