BANNER

The Janshakti News

मयत बांधकाम कामगार "सोहेल दस्तगीर मुल्ला" यांच्या कुटुंबीयाना आर्थिक मदत द्यावी...संजय कांबळे... जिल्हाध्यक्ष,अखिल महाराष्ट्र कामगार - कर्मचारी संघ,यांची मागणी...मयत बांधकाम कामगार "सोहेल दस्तगीर मुल्ला" यांच्या कुटुंबीयाना आर्थिक मदत द्यावी...

 संबंधित स्थापत्य अभियंता, ठेकेदार, घर बांधणारा मालक यांच्याकडून बांधकाम कामगारांस जीवनावश्यक सुरक्षेच्या उपाययोजना देण्याच्या सूचना करण्यात यावेत... 
                    संजय कांबळे...
जिल्हाध्यक्ष,अखिल महाराष्ट्र कामगार - कर्मचारी संघ,यांची मागणी...
=====================================
=====================================

सांगली | दि. २३ फेब्रुवारी २०२२

ॲड.प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या अखिल महाराष्ट्र कामगार - कर्मचारी संघ,महाराष्ट्र राज्य सांगली जिल्हा अध्यक्ष मा.संजय कांबळे यांच्या शिष्टमंडळाने, मयत झालेले बांधकाम कामगार सोहेल दस्तगीर मुल्ला यांचे बांधकाम काम करत असताना दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. त्यामुळे सहाय्यक कामगार आयुक्त मा.अनिल गुरव साहेब यांना लेखी निवेदन देऊन मयत झालेले बांधकाम कामगार "सोहेल दस्तगीर मुल्ला" यांच्या कुटुंबीयाना शासकीय व संबंधित स्थापत्य अभियंता, ठेकेदार, घर बांधणारा मालक यांच्याकडून आर्थिक मदत मिळवून देण्यात यावी असे विनंती निवेदन देण्यात आले. निवेदनात असे म्हटले आहे की, काही दिवसां पूर्वी मिरज येथे काम करीत असताना  "सोहेल दस्तगीर मुल्ला" या बांधकाम कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा बांधकाम कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. बांधकाम कामगार हा दिवसरात्र कष्ट करून दुसऱ्याचे घर उभे करतो. पण सद्यस्थितीत सांगली जिल्ह्यात बांधकाम सुरू असलेल्या बहुतांश ठिकाणी बांधकाम कामगारांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना केल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे सोहेल मुल्ला सारख्या असंख्य बांधकाम कामगारांच्या जीवनावर धोक्याची घंटा आहे हे आपण समजून घेतले पाहिजे. त्यामुळे आम्ही अशी मागणी करतो, सांगली जिल्ह्यातील ज्या ज्या ठिकाणी बांधकाम सुरू असतील त्याठिकाणी संबंधित स्थापत्य अभियंता, ठेकेदार, घर बांधणारा मालक यास बांधकाम कामगारांसाठी आवश्यक त्या सर्व सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना तात्काळ देण्याचे आदेश आपल्या कार्यालयाकडून पारित व्हावेत.तसेच मयत बांधकाम कामगार "सोहेल दस्तगीर मुल्ला" यांच्या कुटुंबीयाना शासकीय व संबंधित स्थापत्य अभियंता, ठेकेदार, घर बांधणारा मालक यांच्याकडून आर्थिक मदत मिळवून देण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.
 सहाय्यक कामगार आयुक्त मा.अनिल गुरव साहेब यांनी तात्काळ खासबाब म्हणून मयत कामगार सोहेल दस्तगीर मुल्ला यांच्या पत्नीला आर्थिक मदत म्हणून- दहन करण्यासाठी - 10 हजार तसेच तातडीची मदत 5 लाख,आणि मयत कामगाराच्या पत्नीला 24 हजार देण्यासाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई यांना लेखी मागणी केली. त्याबद्दल अखिल महाराष्ट्र कामगार - कर्मचारी संघाच्या शिष्टमंडळाने आभार मानले.   
   यावेळी अखिल महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघ महाराष्ट्र राज्य. सांगली जिल्हाध्यक्ष मा.संजय भूपाल कांबळे तसेच जनरल सेक्रेटरी मा.संजय संपत कांबळे यांच्या बरोबरच वंचित बहुजन आघाडी सांगली जिल्हा महासचिव उमरफारूक ककमरी, जयदिप जगदाळे,अनिकेत जगदाळे,संगाप्पा शिंदे,चंद्रकांत कांबळे,अरूण सर्जे,युवराज कांबळे,विक्रांत सादरे,शिवकुमार वाली,संजय चव्हाण,शरद अमृतसागर,दिलीप गाडे,प्रकाश वाघमारे,सुरेश आठवले आदी पदाधिकारी व कामगार कर्मचारी उपस्थित होते.

■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■


■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■