BANNER

The Janshakti News

भिलवडी येथील व्यापारी संघटना व ग्रामस्थांच्या वतीने " थोर समाजसेविका अनाथांची माई पद्मश्री सिंधुताई सपकाळ " यांना श्रद्धांजली.....



भिलवडी येथील व्यापारी संघटना व ग्रामस्थांच्या वतीने " थोर समाजसेविका अनाथांची माई पद्मश्री सिंधुताई सपकाळ " यांना श्रद्धांजली.....




-------------------------------------------------------------------

संपादक - भाऊसाहेब रुपटक्के

--------------------------------------------------------------------

भिलवडी | दि. ५ जानेवारी २०२२

हजारो अनाथ मुला-मुलींना आश्रय देत त्यांची माय बनलेल्या ज्येष्ठ समाजसेविका पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांचे नुकतेच निधन झाले.त्या ७३ वर्षांच्या होत्या.त्यांच्या स्मृतींना उजाळा देत भिलवडी व्यापारी संघटना व ग्रामस्थांच्या वतीने सिंधूताई सपकाळ यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
 गॅलेक्सी हॉस्पिटल पुणे येथे हार्नियाचे आँपरेशन झाल्यानंतर उपचार घेत असलेल्या सिंधूताई सपकाळ यांचे ०४ जानेवारी २०२२ रोजी रात्री ८ वाजून १० मिनिटांच्या सुमारास हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.सिंधूताई यां महाराष्ट्राच्या मदर तेरेसा म्हणून परिचित होत्या. सिंधुताई यांचा जन्म १४ नोव्हेंबर १९४७ रोजी वर्धा येथे झाला होता.
 महिलांच्या अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्याचे काम करीत त्यांनी त्यांच्या सामाजिक कार्यास प्रारंभ केला. त्यांच्या कार्याची दखल घेऊन सरकारने त्यांना नुकतेच पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले होते.त्यांच्या निधनामुळे सामाजिक क्षेत्रामध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे.भिलवडी येथील व्यापारी संघटना व ग्रामस्थांच्या वतीने त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून, त्यांच्या पवित्र स्मृतीस व सामाजिक कार्यातील ठळक घटनेंच्या आठवणींना उजाळा देण्यात आला.यावेळी ज्येष्ठ साहित्यिक सुभाष कवडे यांनी सिंधुताई यांच्या कार्याविषयीची माहिती आपल्या मनोगतातून व्यक्त केली. यावेळी भिलवडी व्यापारी संघटनेचे सर्व पदाधिकारी,व्यवसायिक महिला व पुरुष  तसेच ग्रामस्थ   उपस्थित होते.


 
■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■



■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■