BANNER

The Janshakti News

राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा व दिव्यांग स्नेहमेळावा मोठ्या उत्साहात संपन्न...



राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा व दिव्यांग स्नेहमेळावा मोठ्या उत्साहात संपन्न...




गडहिंग्लज दि. 12/11/2021

   ऑन. कॅप्टन आबा पाटील फाउंडेशन कडगाव,  व राष्ट्रीय अपंग विकास महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने  कडगाव ता.गडहिंग्लज येथे श्रीमती शारदादेवी आबाजी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व तहसीलदार माननीय दिनेश पारगे व ज्योतिर्लिंग शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष माननीय रियाजभाई शमनजी यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा व दिव्यांग स्नेहमेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
ऑ.कॅप्टन आबा पाटील फाउंडेशन यांच्या वतीने राज्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनी


य कार्य करणाऱ्या राज्यातील 15 व्यक्तींची निवडकरून त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
 

या वर्षीचा दिव्यांग क्षेत्रातील जीवनगौरव राज्य पुरस्कार कोल्हापूर येथील 81 वर्षांचे दिव्यांग व्यक्ती श्री. नारायण लोहार यांना राज्य पुरस्काराने सन्मानित केले. 

तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेतोरे गावची कर्णबधिर युवा चित्रकार पूजा धुरी जी.डी.आर्ट.पेंटिंग पदवी प्रथम श्रेणीत संपादन करून दिव्यांग विद्यार्थ्या मधून महाराष्ट्रात पहिली आल्या बद्दल राज्य पुरस्काराने सन्मानित केले 


तसेच माजी सैनिक परिवारासाठी असलेला यशस्वी राज्यस्तरीय युवा उद्योजक पुरस्कार चीकोडे स्टीलचे श्री. मुरारी चिकोडे यांना देण्यात आला.

  मानपत्र , सन्मानचिन्ह , सन्मानपत्र ,   शाल-श्रीफळ व पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरूप होते.


सदर पुरस्काराचे वितरण तहसीलदार मा. दिनेश पारगे , फौंडेशनचे अध्यक्षा  श्रीमती. शारदादेवी पाटील , मा.रियाजभाई   शमनजी व मा. बाळासाहेब पाटील यांचे हस्ते देण्यात आले. 

दिव्यांग बांधवांच्या खडतर आयुष्यातील मनोकामना उंचविण्यासाठी राबवण्यात आलेल्या या अविस्मरणीय उपक्रमा बद्दल  ज्योतिर्लिंग शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष माननीय रियाजभाई शमनजी यांनी ऑन. कॅप्टन आबा पाटील फाउंडेशन कडगाव,  व राष्ट्रीय अपंग विकास महासंघ यांचे कौतुक केले व त्यांच्या सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.


 कडगावचे सरपंच संजय बटकडली , पोलीस पाटील चिकोडे , श्रीपती कदम , पी.डी पाटील सर आणि प्रा. संतोष पाटील यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. 
या कार्यक्रमास दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमसाठी दत्ता पन्हाळकर सुरेंद्र डवरी सदानंद पाटील , ॲड.शरद दबडे , शंकर चौगुले, यांनी मोलाचे सहकार्य केले.

रिपोर्टिंग --- दिलावरभाई शमनजी..कोल्हापूर