BANNER

The Janshakti News

महाराष्ट्र सरकारने पूरग्रस्त शेतकऱ्यांचा विश्वासघात केला....स्वा.शेतकरी संघटनेने सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत राज्य सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले...

महाराष्ट्र सरकारने पूरग्रस्त शेतकऱ्यांचा विश्वासघात केला....स्वा.शेतकरी संघटनेने सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत राज्य सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे  दहन केले...
सांगली | दि.12/10/2021

महाराष्ट्र शासनाने खोटी आश्वासने देऊन पूरग्रस्त शेतकऱ्यांचा  विश्वासघात  केल्याची घणाघाती टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. सांगली जिल्ह्यातील कृष्णा व वारणा नदीला महापूर येऊन जवळपास तीन महिने झाले तरी पूरग्रस्त शेतकऱ्यांना झालेल्या शेतीचे नुकसान भरपाई पोटी आज अखेर महाराष्ट्र सरकारने एक रुपया देखील त्यांच्या खात्यावर जमा केला नाही. शासनाने 2019 महापुराच्या जीआर प्रमाणे पूर बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचे पैसे मिळावेत म्हणून माननीय राजू शेट्टी साहेब यांनी 1 सप्टेंबर ते 5 सप्टेंबर दरम्यान पदयात्रा काढून नरसिंहवाडी येथे जलसमाधी घेण्याचा निर्णय जाहीर केला होता. एक तारखेपासून पदयात्रा सुरू झाली व पाच तारखेला नरसिंह वाडी येथे  पोहोचल्यानंतर शेतकऱ्यांचा प्रचंड जनसमुदाय बघून अखेर सरकारला नमते घ्यावे लागले.  मुख्यमंत्र्यांनी प्रांत व शिरोळचे तहसीलदार यांच्याद्वारे लेखी पत्र देऊन    स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी सह शिष्टमंडळास मुंबई येथे चर्चेसाठी आमंत्रित करण्यात आले. जलसमाधी घेऊ नये असे राजू शेट्टी यांना सांगितले. 


राज्य शासनाबरोबर झालेल्या बैठकीमध्ये  आम्ही 2019 च्या पूर्वीच्या  शासनाने जाहीर केलेल्या निर्णयानुसार शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणार असे जाहीर केले होते. परंतु या सरकारने त्यांचे आश्वासन पाळले नाही व प्रति गुंठा 135 रुपये असे अनुदान जाहीर केले म्हणजे एकरी पाच हजार चारशे रुपये शेतकऱ्याला मिळणार त्या अनुदानातून शेतकरी रानातील कचरा सुद्धा काढू शकत नाही म्हणजे या सरकारला शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काहीही देणे घेणे नाही तसेच मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळला नाही


 म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जिल्ह्याच्या वतीने आज दि.12/10/2021 रोजी सांगली माधवनगर दरम्यान सर्किट हाऊस जवळ राज्य सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले.जोपर्यंत पूरग्रस्तांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वस्त बसणार नाही असे जाहीर करण्यात आले. 


यावेळी उपस्थित जिल्हाध्यक्ष सूर्यकांत मोरे पक्षाचे अध्यक्ष महेश खराडे कार्याध्यक्ष संदीप राजोबा राज्य प्रवक्ते एडवोकेट संदे युवा आघाडीचे अध्यक्ष संजय बेले ,   भागवत जाधव , प्रवीण पाटील , माणिक शिरोटे , विलास पाटील , बाळासो शिंदे , सुधीर जाधव , धन्यकुमार पाटील , सम्मेद पाटील , मुकेश पाटील , राम पाटील , प्रभाकर पाटील , जगन्नाथ भोसले , बाळासो जाधव , दामाजी डुबल , गुंडा आवटी , संजय खोलकुंबे , सुरेश वसगडे , संतोष शेळके ,  प्रताप पाटील , डवरी बुवा , तानाजी शेळके तसेच तालुक्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते या बैठकीसाठी उपस्थित होते.