BANNER

The Janshakti News

आशा स्वंयसेविकांच्या बाबतीत योग्य ती खबरदारी घेऊन यापुढे योग्य त्या सुविधा पुरविल्या जातील... डॉ.नरेंद्र पवार



आशा स्वंयसेविकांच्या बाबतीत योग्य ती खबरदारी घेऊन यापुढे योग्य त्या सुविधा पुरविल्या जातील... डॉ.नरेंद्र पवार



 
चांगली वागणूक देण्याची आशा स्वंयसेविकांची मागणी....

भिलवडी | दि. ८/९/२०२१

आशा स्वंयसेविकांना चांगली वागणूक देवून,त्यांना योग्य त्या सुविधा पुरविण्यात याव्यात अशी मागणी भिलवडी , माळवाडी व परीसरातील आशा स्वंयसेविकांनी पलूस तालुका वैद्यकीय अधिकारी व भिलवडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी यांच्याकडे केली आहे.


भिलवडी प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या कडून चांगली वागणूक मिळत नाही , नको त्या भाषेत बोलले जाते , वेळोवेळी विनंती करून देखील कोरोनाच्या काळात केलेल्या कामकाजाच्या कागदपत्रावरती वेळेवर सह्या केल्या जात नाहीत, अशा अनेक  तक्रारी उपस्थित आशा स्वंयसेविकांच्या वतीने करण्यात आलेल्या होत्या.


दि. ४/९/२०२१ रोजी माळवाडी येथील आशा स्वंयसेविका  भाग्यश्री माळी यांना औदुंबरला जात असताना अपघात झाला होता. या अपघातात त्यांच्या डोक्याला जबर मार लागला होता त्यामुळे त्यांना तातडीने भिलवडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आणण्यात आले होते. 


परंतु आरोग्य केंद्रात डॉक्टर नसल्यामुळे वैद्यकीय अधिकारी आल्यानंतर तब्बल एक तासाने सदर आशा स्वंयसेविकेवर प्राथमिक उपचार करण्यात आले. परंतु त्यांच्या डोक्याला जबर मार लागल्या कारणाने तात्काळ त्यांच्या डोक्याचा सिटीस्कॅन करणे गरजेचे होते त्यातच त्यांची स्थिती नाजूक असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना सुविधा असलेल्या ठिकाणी जाण्यासाठी रेफर चिठ्ठी देण्यात आली असे वैद्यकीय अधिकारी यांनी सांगितले. 


अपघातात गंभीर जखमी झालेल्या आशा स्वंयसेविकेची प्रकृती चिंताजनक असताना देखील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांनी  आरोग्य केंद्रात ऍम्ब्युलन्स उपलब्ध असताना देखील जखमी अवस्थेत असणाऱ्या आशा स्वंयसेविका यांना पुढील उपचारासाठी घेऊन जाण्याकरिता ती उपलब्ध करून दिली नाही. या गंभीर घटनेचा गांभीर्याने विचार करून त्यांची चौकशी करावी अशी मागणी लाल बावटा आशा वर्कर्स व गटप्रवर्तक युनियन सांगली जिल्हा हणमंत कोळी यांनी केली आहे. 


संबंधित बाबीची माहिती घेण्यासाठी हणमंत कोळी व आशा स्वंयसेविका यांनी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रागिणी पवार व भिलवडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. नरेंद्र पवार यांची भिलवडी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये भेट घेऊन घडलेल्या प्रकाराबाबत विचारना केली असता, घडला प्रकार चुकीचा असून, यापुढे आशा स्वंयसेविकांच्या बाबतीत योग्य ती खबरदारी घेण्यात येईल तसेच

त्यांना योग्य त्या सुविधा पुरविण्यात येतील असे आश्वासन डॉ.नरेंद्र पवार यांनी दिले आहे.यावेळी पलूस तालुका आरोग्य अधिकारी डॉ.रागिणी पवार, लाल बावटा आशा वर्कर्स व गटप्रवर्तक युनियन सांगली जिल्हा हणमंत कोळी व भिलवडी , माळवाडी व परीसरातील आशा स्वंयसेविका उपस्थित होत्या.