तासगांव नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूका - डि. पी. आय स्वबळावर लढविणार...- नंदकुमार नांगरे
तासगांंव | दि. ०४ / ०९ / २०२१
तासगांव दिनांक २/९/२०२१ रोजी डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया डी.पी.आय.पक्षाच्या वतीने तासगांव तालुका मातंग समाज व डी.पी.आय.पदाधिकारी, कार्यकर्ते यांची बैठक आयोजित करण्यात आली होती.
यावेळी बैठकीच्या अध्यक्षस्थानावरुन डी.पी.आय. पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष नंदकुमार नांगरे म्हणाले की. डी.पी.आय. पक्ष येणाऱ्या आगामी तासगांव नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत तासगांव तालुक्यातील सर्व जाती - धर्माच्या लोकांना सोबत घेऊन निवडणूका स्वबळावर लढविणार असून. डी.पी.आय. पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी कामाला लागावे.
संपूर्ण तासगांव तालुक्यामध्ये
प्रत्येक वार्डात, प्रत्येक गावात डी. पी. आय. पक्षाच्या शाखा काढून इथल्या जातीयवादी व्यवस्थेला हादरा देऊन डी.पी.आय. पक्षाचे कार्यकर्ते सत्तेत घालवूया असा खणखणीत इशारा त्यांनी या बैठकीच्यावेळी दिला. पुढे ते म्हणाले की. गेल्या सत्तर वर्षामध्ये बहुजन समाजाला राजकारणापासून कोसो दूर ठेवले आहे. म्हणून आपल्याला राजकारणात दखलपात्र व्हायचे असेल तर डि. पी. आय पक्षा शिवाय पर्याय नाही. इथुन पुढच्या काळात डि. पी. आय. पक्षाचे उमेदवारच त्या जातीयवादी धर्मांध विचारांच्या पुढाऱ्यांना त्यांची जागा दाखवेल असेही नंदकुमार नांगरे यांनी सांगितले.
यावेळी डि. पी. आय. पक्षाचे जमीन झोपडी हक्क अभियान प्रमुख अशोकराव वायदंडे, राज्य सरचिटणीस संदिप तात्या ठोंबरे, सतिश लोंढे, भास्कर सदाकळे याचीही भाषणे झाली.
यावेळी प्रमुख पदाधिकारी यांच्या निवडी करण्यात आल्या.
माः भास्कर सदाकळे (सावर्डे) यांची पश्चिम महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी
माः अमित कांबळे (सावळज) यांची सांगली जिल्हा युवक कार्याध्यक्षपदी
माः गोरख सदाकळे (मतकुणकी) यांची सांगली जिल्हा उपाध्यक्षपदी
माः म्हाकू मोरे, तासगांव (माजी नगरसेवक) यांची सांगली जिल्हा सल्लागारपदी
माः सागर भोरे, तासगांव तालुका अध्यक्षपदी
माः हणमंतराव सदाकळे (डोर्ली) यांची सह सल्लागारपदी
माः अमोल कांबळे - (विसापूर) यांची तासगांव तालुका उपाध्यक्षपदी
माः राहुल कांबळे (गवरगाव) यांची तासगांव तालुका उपाध्यक्षपदी
माः विपूल भोरे तासगाव शहर अध्यक्षपदी यांची फेरनिवड करण्यात आली.
इत्यादी पदाधिकारी यांच्या निवडी करण्यात आल्या.
शेवटी आभार माः हणमंतराव सदाकळे यांनी मांडले.