BANNER

The Janshakti News

ई पीक पाहणी शेतकऱ्यांसाठी वरदान... मोबाईल द्वारे शेतीच्या बांधावरून ७/१२ वरती पिकांच्या नोंदी बाबत मार्गदर्शन...



ई पीक पाहणी शेतकऱ्यांसाठी वरदान...
मोबाईल द्वारे शेतीच्या बांधावरून ७/१२ वरती पिकांच्या नोंदी बाबत मार्गदर्शन...

  

【आडवा मोबाईल धरून व्हिडीओ पहा..】



भिलवडी | दि. २२/०९/२०२१

    भारताच्या ७५ व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासन व महसूल विभागाच्या माध्यमातून १५  ऑगस्ट २०२१ रोजी शेतकऱ्यांना आपल्या शेतातील पिकाची नोंद स्वतः बांधावरून नोंदवण्याकरिता "ई पीक पाहणी" या अद्यावत प्रणालीस सुरुवात करण्यात आली. ई पीक पाहणी या प्रणालीच्या माध्यमातून पीक नोंद करण्याचा कालावधी १५ ऑगस्ट २०२१ ते १५ सप्टेंबर २०२१ हा होता परंतु पीक नोंदणीस मिळालेल्या उत्तम प्रतिसादामुळे शासन परिपत्रकानुसार १५ सप्टेंबर पासून ३० सप्टेंबरपर्यंत पिकांची नोंद करण्याकरिता मुदत वाढविण्यात आली आहे.

ई पीक नोंदणीस उत्तम प्रतिसाद लाभत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे मात्र गाव शिवारात पीक नोंद करत असताना शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. पीक नोंदिकरिता ही अद्यावत प्रणाली असून याचा फायदा शेतकऱ्यांना नक्कीच होणार असला तरी याची अंमलबजावणी शासकीय कर्मचाऱ्यांच्या कडून करण्याची मागणी राज्यमंत्री बच्चू कडू पाटील यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे.

शेतकऱ्यांच्याकडून सहजरीत्या ई पीक पाहणी द्वारे पिकाची नोंद होण्याकरिता व पीक नोंदणी करत असताना येणाऱ्या तांत्रिक अडचणी निवारण करण्याकरता ग्रामपंचायत कार्यालय व कृषी समिती यांच्या वतीने श्री. विशाल अरुण नलवडे , माळवाडी (भिलवडी) ता. पलुस, जि. सांगली यांच्याकडून ई-पीक पाहणी करता प्रत्यक्ष प्रक्रियेबाबत सोबतच्या व्हिडीओच्या माध्यमातून  मार्गदर्शन केले आहे.व सर्व शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी च्या माध्यमातून आपल्या पिकांची नोंद करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.