BANNER

The Janshakti News

भिलवडी येथे हॉटेल ग्रीनपार्क लॉजिंगचा उद्घाटन सोहळा मोठ्या दिमाखात संपन्न...



भिलवडी येथे हॉटेल ग्रीन पार्क लॉजिंग चा उद्घाटन सोहळा मोठ्या दिमाखात संपन्न...

भिलवडी | दि. 31/08/2021






भिलवडी ता. पलूस येथील भिलवडी गावचे सुप्रसिद्ध उद्योजक व हॉटेल ग्रीन पार्क चे मालक रमेश मारुती पाटील यांनी भिलवडी माळवाडी दरम्यान असलेल्या कृष्णा पेट्रोल पंपाच्या समोर नव्याने सुरू केलेल्या " हॉटेल ग्रीन पार्क लॉजिंग " चा उद्घाटन सोहळा सोमवार दिनांक 30 /8 /2021 रोजी मोठ्या दिमाखात संपन्न झाला.अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत " हॉटेल ग्रीन पार्क लॉजिंग " चे उद्घाटन दुग्ध उत्पादन क्षेत्रात सातासमुद्रापार भिलवडी गावाचे नांव लौकिक केलेले " चितळे उद्योग समूहाचे " उद्योजक मा.गिरीश चितळे व मकरंद चितळे या बंधूंच्या शुभास्ते करण्यात आला.
या उद्घाटन सोहळ्यासाठी अंकलखोप गावचे उद्योजक सतीश (आबा) पाटील , पलुस तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मोहन पाटील सर , भिलवडी गावचे माजी सरपंच धनंजय पाटील , माजी उपसरपंच तानाजी भोई , भिलवडी शिक्षण संस्थेचे संचालक व्यंकोजी जाधव , भिलवडी येथील व्यापारी संघटनेचे सर्व पदाधिकारी ,  पत्रकार बंधु यांच्यासह भिलवडी व परीसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


यावेळी उद्योजक गिरीश चितळे मोहन पाटील सर सतीश आबा पाटील पत्रकार दत्ता उतळे चॅलेंजर ग्रुप चे अध्यक्ष दीपक पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. हॉटेल व्यवसाय क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतलेले उद्योजक रमेश पाटील यांनी गेल्या अनेक वर्षांपासून साध्या पत्र्याच्या शेडमध्ये चालू केलेले हॉटेल ग्रिनपार्क रेस्टॉरंटच्या माध्यमातून ते आज गगनचुंबी अशी " हॉटेल ग्रिनपार्क लॉजिंग " ची इमारत... परीवारासहित रात्रंदिवस घेतलेले परिश्रम , त्याचबरोबर हॉटेल व्यवसायाबरोबरच राजकीय व सामाजिक कार्याची आवड याबद्दल सर्वच मान्यवरांनी रमेश पाटील यांचे कौतुक  केले. त्याचबरोबर भिलवडी परिसरात बाहेर गावावरून येणाऱ्या लोकांची  राहण्याची व जेवणाची सोय एकाच ठिकाणी व्हावी यासाठी लोकांना परवडेल व सर्व सुविधा असलेले सुसज्ज असे " हॉटेल ग्रिनपार्क लॉजिंग " ची भव्य आणि दिव्य अशी वास्तू उभारल्या बद्दल सर्वच उपस्थितांनी रमेश पाटील व त्यांच्या परीवाराचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या....
यावेळी स्वागत , प्रास्ताविक रमेश पाटील यांनी केले तर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शरद जाधव सर यांनी केले व शेवटी आभार संजय पाटील सर यांनी मानले...