BANNER

The Janshakti News

अलमट्टी धरण भरले ९५ टक्के

अलमट्टी धरण  भरले ९५ टक्के 



गेल्या चार दिवसांपासून अलमट्टी धरणात पाणी अडवण्यास सुरुवात झाल्याने आता अलमट्टी धरण 95 टक्के भरले आहे. रविवारी या धरणामध्ये 116.87 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. या धरणातून आता 72 हजार 601 क्युसेक पाण्याचा विसर्ग आहे.

बेळगाव जिल्ह्यात आता पावसाने पूर्णपणे उघडीप दिली आहे. या धरणाची क्षमता 123.08 टीएमसी असून रविवारी या धरणातील पाणीसाठा 116.87 टीएमसी आहे.

रविवारी या धरणामध्ये 95 हजार 436 क्युसेक पाण्याची आवक होती तर 72 हजार 601 क्युसेक विसर्ग आहे. गेल्या चार दिवसांपासून या धरणाध्ये पाणी अडवण्यास सुरुवात करण्यात आल्याने अलमट्टी धरण आता 95 टक्क्यापर्यंत भरले आहे.

पावसाची उघडीप

जिल्ह्यामध्ये गेल्या पंधरवड्यानंतर पावसाने पूर्णपणे उघडीप दिली आहे. शहर परिसरात कडक ऊन पडत आहे. गेल्या 24 तासांत सकाळी 8 पर्यंत बेळगाव 2 मिमी, खानापूर 3.6, रायबाग 1.2, हुक्केरी 0.5, गोकाक 1.1, निपाणी 3.6, चिकोडी 0.8 व कागवाडमध्ये 5.2 मिमी पावसाची नोंद झाली.

Tags