yuva MAharashtra "बालसुरक्षा हीच खरी जबाबदारी! प्रत्येक गावाने सुरक्षित वातावरण निर्माण करण्याची आजची गरज"

"बालसुरक्षा हीच खरी जबाबदारी! प्रत्येक गावाने सुरक्षित वातावरण निर्माण करण्याची आजची गरज"



सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यात नुकत्याच घडलेल्या का गंभीर घटनेने समाजमन पुन्हा एकदा हादरले आहे. अशा प्रकारच्या घटना कोणत्याही गावात किंवा परिसरात घडू नयेत, यासाठी केवळ कायद्याची भीती पुरेशी नाही, तर समाजात जागृती, संवेदनशीलता आणि सामूहिक जबाबदारीची भावना निर्माण होणे अत्यंत आवश्यक आहे.


प्रत्येक बालकाला सुरक्षित, निर्भय आणि सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे. मुलांवरील कोणत्याही प्रकारचा लैंगिक, मानसिक किंवा शारीरिक अत्याचार हा गंभीर गुन्हा असून अशा कृत्यांविरोधात समाजाने शून्य सहनशीलतेची भूमिका घ्यावी.


पालकांनी आपल्या मुलांशी मोकळेपणाने संवाद साधावा, चांगला व वाईट स्पर्श (Good Touch – Bad Touch) याबाबत योग्य मार्गदर्शन करावे आणि मुलांच्या वर्तनातील बदल गांभीर्याने घ्यावेत.


 शाळा, ग्रामपंचायत, सामाजिक संस्था व नागरिकांनी वेळोवेळी बालसुरक्षा विषयक जनजागृती कार्यक्रम आयोजित करणे ही काळाची गरज आहे.


संशयास्पद प्रकार आढळल्यास तो लपवून न ठेवता तात्काळ पोलीस प्रशासन किंवा संबंधित यंत्रणांना माहिती द्यावी. प्रत्येक नागरिकाने सजग राहून बालकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिल्यास अशा घटना रोखण्यास मोठी मदत होऊ शकते.


"द जनशक्ती न्यूज"चे आवाहन :

आपल्या गावातील प्रत्येक मुलगा आणि मुलगी सुरक्षित राहणे ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. चला, जागरूक समाज घडवूया, बालकांचे संरक्षण करूया आणि अशा अमानुष घटनांना कायमचा आळा घालूया.


   🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰





🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰

𝗟𝗶𝗻𝗸𝘀

YouTube Channel

🌐 https://youtube.com/@thejanshakatinews5707

News Portal

🌐 www.theJanShaktiNews.in

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰