BANNER

The Janshakti News

तृतीयपंथीय व्यक्तींनी ओळखपत्रासाठी पोर्टलवर नोंदणी करावी - सहाय्यक आयुक्त जयंत चाचरकर        सांगली दि. 24 (जि.मा.का.) :   सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालय, नवी दिल्ली यांच्याकडून तृतीयपंथीय व्यक्तींना (NATIONAL PORTAL FOR TRANSGENDER PERSON - https:// transgender.dosje.gov.in) हे राष्ट्रीय पोर्टल 25 नोव्हेंबर 2020 पासून सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवर तृतीयपंथी व्यक्ती ते कुठेही असतील तेथून ओळखपत्र व प्रमाणपत्र मिळणेकामी ऑनलाईन अर्ज करू शकतात. जिल्ह्यातील तृतीयपंथीय व्यक्तींनी या पोर्टलवर नोंदणी करून ओळखपत्र व प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यावे, असे आवाहन समाज कल्याण सांगली कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त जयंत चाचरकर यांनी केले आहे.

तृतीयपंथीयाचे कल्याण व त्यांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी केंद्र शासनाने तृतीयपंथीय व्यक्तींच्या हक्कांचे संरक्षण कायदा 2019 व 2020 व्दारे मार्गदर्शक सुचना निर्गमित केलेल्या आहेत. त्या अनुषंगाने अर्ज भरताना तृतीयंपथीय व्यक्ती यांनी त्यांचे आधारकार्ड / मतदानकार्ड / पॅनकार्ड / जन्माचा दाखला / रेशनकार्ड / पासपोर्ट / पासबुक / जातीचा दाखला / मनरेगा कार्ड या नमूद दस्तऐवजांपैकी कोणतेही एक कागदपत्र आणि रहिवासाबाबत विहीत नमुन्यातील प्रतिज्ञापत्र अर्ज भरताना अपलोड करणे आवश्यक आहे. केंद्र शासनाच्या तृतीयपंथीय व्यक्तींच्या हक्कांचे संरक्षण कायदा 2020 अन्वये तृतीयपंथीयांना प्रमाणपत्र / ओळखपत्र देण्याचे अधिकार जिल्हाधिकारी यांना प्रदान करण्यात आले आहेत, श्री. चाचरकर यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


Youtube Link
👇

https://youtube.com/@thejanshakatinews5707

Portal Link
👇

www.thejanshaktinews.in

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖