BANNER

The Janshakti News

दलित वस्ती सुधार योजना मधील राखीव असणारे कोट्यवधी निधीचा गैर वापर.. शाखा अभियंता,शहर अभियंता, नगर अभियंता तसेच काम सुचविणारे लोक प्रतिनिधी यांनी आजपर्यंत केलेल्या बेकायदेशीर कामाची तसेच त्यांच्या वर्षोनुवर्षे वाढत असणाऱ्या संपत्तीची / मालमत्तेची "ED" मार्फत चौकशी करा...संजय कांबळे


वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन यांची मागणी...

==============================
======================================

सांगली : वार्ताहर दि. १० जुलै २०२३

आद.ऍड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन सांगली जिल्हा यांचे जिल्हाध्यक्ष मा.संजय कांबळे साहेब यांच्या नेतृत्वाखाली मा. आयुक्त सो, महापालिका यांना दलित वस्ती सुधार योजना मधील राखीव असणारे कोट्यवधी निधीचा गैर वापर केला असल्याने जबाबदार सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका मधील शाखा अभियंता,शहर अभियंता, नगर अभियंता तसेच काम सुचविणारे लोक प्रतिनिधी यांनी आजपर्यंत केलेल्या बेकायदेशीर कामाची तसेच त्यांच्या वर्षोनुवर्षे वाढत असणाऱ्या संपत्तीची / मालमत्तेची "ED" मार्फत चौकशी करा , त्यांना तत्काळ अटक करा. याबाबतीत निवेदन द्वारे कळविण्यात आले. त्यांनी दिलेला निवेदनात असे म्हटले आहे की, सांगली मिरज आणि कुपवाड "शहर महापालिका क्षेत्रात
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे दलित नागरीवस्ती ‌सुधार योजना अंतर्गत" (०९-०५-२०२३) अखेर उपलब्ध निधी मधून वार्ड क्रं. १० अ, सांगली येथील काळीखण सुशोभीकरणा साठी ०१,२८,३३,९१४/- रू रक्कम खर्च करण्यात आला आहे.
दलित वस्ती सुधार योजना अंतर्गत राखीव निधीचा वापर फक्त दलित वस्ती मध्येच खर्च करणे आवश्यक असताना काळीखण सुशोभीकरण व जलस्रोत परिसरात पायाभूत सुविधा विकसित करणे तसेच जलस्रोत सुरक्षित करणे या कामी शासनाने दलित वस्ती सुधार करण्यासाठी दिलेला राखीव निधीचा वापर केल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच प्रभाग समिती क्रमांक - ३ कुपवाड वार्ड क्रं.१ मध्ये, सन २०१९ - २०२० जिल्हा वार्षिक योजना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे दलितवस्ती सुधार योजना (०१/१२/२०२२ अखेर) दलितवस्ती सुधार योजना राखीव निधीतून कुपवाड वार्ड क्रं.१ मध्ये खालील प्रमाणे कामे करण्यात आली आहेत.

१) कलमेश्वर सोसायटीमधील अंतर्गत रस्ते हॉटमिक्स डांबरीकरण करणे - ०१,१४,५००/- रक्कम (रू)

२) बसवेश्वर सोसायटी मुख्य रस्ता व चार्मिज ब्युटीपार्लर समोरील रस्ता हॉटमिक्स डांबरीकरण करणे.११,१६,५००/- रक्कम (रू)

३) शांतीसागर चौक समोरील एल टाईप इंटर पी सी सी गटर करणे, ०४,८०,३००/- रक्कम (रू)

४) शांतीसागर चौक ते माऊली बंगला पूर्व + पश्चिम रस्ता हॉटमिक्स डांबरीकरण करणे ०३,७१,२००/- रक्कम (रू)

५) पाटील यांचे ओपन प्लाॅट ते दिवटे घर रस्ता हॉटमिक्स डांबरीकरण करणे - ०५,५५,२००/- रक्कम (रू)

६) नाईक घर ते पाटील घर पूर्व+पश्चिम रस्तेस पी सी सी गटर करणे - १२,००,०००/- (रु.)

७) कवठेकर घर ते वरद ट्रेडर्स दक्षिण+उत्तर रस्ता हॉटमिक्स डांबरीकरण करणे - ११,८१,१००/- रक्कम (रू)

८) वार्ड क्रं.२ मुख्य रस्ता अलंकार कॉलनी अतंर्गत रस्ते हॉटमिक्स डांबरीकरण करणे - ०९,२१,५००/- रक्कम (रू)
असा प्रकारे अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात सुधारीत व उच्चभ्रू वस्ती (सुवर्ण वस्ती) मध्ये असणाऱ्या नागरीकांना दलित नागरिकांचा हक्काचा निधी खर्च केला आहे. शाखा अभियंता, शहर अभियंता तसेच नगर अभियंता आणि लोक प्रतिनिधी यांनी संगतमताने गैरकारभार केलेला आहे. हा सगळा खटाटोप ठेकेदाराकडून टक्के वारी नुसार कोट्यवधींच्या रक्कमा मिळविण्यासाठी केले आहे. मात्र शंभर टक्के मागासवर्गीय घटकातील लोक वस्तीत गेले दहा वर्षापूर्वी पासून नागरीसुविधा देण्यापासून महापालिका प्रशासन बांधकाम विभागाने जाणीवपूर्वक पध्दतशीरपणे वंचित ठेवलेले आहे.


महापालिका बांधकाम विभागाच्या प्रशासन जबाबदार असणारे
शाखा अभियंता, शहर अभियंता, नगर अभियंता तसेच काम सुचविणारे लोक प्रतिनिधी यांनी कामाच्या टक्केवारी साठी कोट्यावधी रुपये निधी मिळविण्यासाठी त्यांनी दलित वस्ती सुधार करण्यासाठी प्राप्त झालेल्या निधी हा फक्त दलित वस्ती मध्येच खर्च करण्यात आला पाहिजे असता त्यांनी दलित नागरिकांच्या हक्काचा निधीचा गैर वापर केला आहे. जबाबदार संबधित अधिकारी यांची नियुक्ती पासून आजतागायत केलेल्या कामाची चौकशीसाठी समिती नेमणूक करून ऑडिट करण्यात यावे तसेच केलेले बेकायदेशीर कारभाराचा चौकशी होऊन आत्तापर्यंत चे सर्व भ्रष्ट व्यवहार जनतेसमोर येऊन मागासवर्गीय लोकांना योग्य न्याय मिळाले पाहिजे, प्रति वर्षामध्ये संबंधित अधिकारी आणि काम सुचविणारे लोक प्रतिनिधी यांच्या संपत्ती मधील वाढ तसेच त्यांनी केलेल्या आजतागायत बेकायदेशीर कामाची " ED " मार्फत चौकशी करावी तसेच अनुसूचित जाती व जमाती यांच्या हक्काचे विकास कामांचा प्राप्त निधी या सर्वांनी संगतमताने लाटला असून अनुसूचित जाती जमाती मधील नागरीकांची गेले दहा वर्षापूर्वी पासून महापालिका क्षेत्रात विकास कामे कारणेबाबत अनेकदा निवेदन देण्यात आले आहे, परंतु जाणीव पूर्वक दलित वस्ती मध्ये विकास कामाचा दुर्लक्ष करून निधी परस्पर इतर ठिकाणी वळविण्यात आले आहे,
हे जाणीव पूर्वक मागासवर्गीय लोकांना सुविधे पासून वंचित ठेवण्यात आले आहे व मुद्दाम हून जाणीवपूर्वक अन्याय केलेला आहे. तसेच दलित वस्ती मध्ये सुविधांचा अभाव असताना, कोणतेही नागरी सुधारणा न करता त्या ठिकाणी दिवसेंदिवस रोगराई,नागरिक सुविधा पासून वंचित ठेवणे,अंधार,गटारी,रस्ते इ.सुविधांचा अभावामुळे वस्ती भकास होत आहेत. हे महानगरपालिका प्रशासनाला वरचेवर लेखी निवेदन माहिती देऊन ही शंभर टक्के मागासवर्गीय घटकातील नागरिक वस्ती मात्र दुर्लक्ष केले आहे. यासाठी जबाबदार असणाऱ्या प्रत्येक अधिकारी व लोकप्रतिनिधी यांचेवर अनुसूचित जाती व जमाती अन्याय अत्याचार प्रतिबंधक कायदा नुसार आपल्या कार्यालया मार्फत गुन्हा नोंद व्हावे तसेच संबधित अधिकारी व संलग्न कर्मचारी यांचे सेवा पुस्तकावर नोंदणी घेऊन कर्तव्यात कसूर केल्याने बडतर्फ करण्यात यावे.
१) महापालिका प्रशासन आयुक्तसो आपल्या कार्यालयातील तसेच कार्यक्षेत्रातील प्रशासन अधिकारी यांनी केलेले गंभीर प्रकार असल्याने आणि
२) मा. सहाय्यक आयुक्तसो, समाज कल्याण विभाग. सांगली जिल्हा यांच्या मार्फत महानगरपालिका क्षेत्रातील दलित नागरिकांची वस्ती सुधार करण्यासाठी विकास कामांच्या करीता अटी शर्ती तसेच निकषांवर निधी उपलब्ध करून देण्यात आले असताना त्याचे पालन महापालिका प्रशासकीय अधिकारी यांनी केले नसल्याचे स्पष्ट दिसून येत आहे तरी आपण जबाबदार महापालिका आयुक्त नात्याने संबंधित कार्यास जबाबदार असणाऱ्या महापालिका बांधकाम विभागातील प्रशासन अधिकारी तसेच काम सुचविणारे लोकप्रतिनिधी यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अन्यथा वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन, महाराष्ट्र राज्य. सांगली जिल्हा यांच्या मार्फत कायदेशीर मार्गाने आंदोलन करावे लागेल व होणाऱ्या नुकसानीला महानगरपालिका प्रशासन तसेच समाज कल्याण विभाग जबाबदार राहणार आहेत. यांची नोंद घ्यावी. आशा इशारा हि देण्यात आला आहे.


यावेळी, वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन पश्चिम महाराष्ट्र महासचिव मा. प्रशांत वाघमारे साहेब हे आवर्जून उपस्थित होते, यावेळी जिल्हाध्यक्ष मा.संजय संपत कांबळे, जिल्हा महासचिव मा.अनिल मोरे सर, जिल्हा संपर्कप्रमुख मा.संजय भूपाल कांबळे, जिल्हा उपाध्यक्ष मा.मानतेश कांबळे, जिल्हा सदस्य मा. दिपक कांबळे, आनंद कांबळे, जगदिश कांबळे,आनंदा गाडे, विठ्ठल जाधव, संदिप कांबळे, चंद्रकांत कांबळे, युवराज कांबळे, विक्रांत सादरे, शिवकुमार वाली, रमेश कांबळे यांच्या बरोबर बहुसंख्येने अनुसूचित जाती व जमाती मधील नागरिक उपस्थित होते.

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆

https://youtube.com/@thejanshakatinews5707

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆