yuva MAharashtra पलूस तालुक्यातील मंडप व्यावसायिकांनी शासनाकडे केल्या विविध मागण्या.... तहसिलदार निवास ढाणे यांना दिले मागण्यांचे निवेदन....

पलूस तालुक्यातील मंडप व्यावसायिकांनी शासनाकडे केल्या विविध मागण्या.... तहसिलदार निवास ढाणे यांना दिले मागण्यांचे निवेदन....



पलूस तालुक्यातील मंडप व्यावसायिकांनी शासनाकडे  केल्या विविध मागण्या....

तहसिलदार निवास ढाणे यांना दिले मागण्यांचे निवेदन....

-----------------------------------------------------------------
                सामान्य जनतेचा बुलंद आवाज....!
संपादक - भाऊसाहेब रुपटक्के.
-------------------------------------------------------------------


पलूस | दि. २५ जानेवारी २०२२

पलूस तालुक्यातील मंडप व्यावसायिक यांनी आज आपल्या विविध मागण्यांचे निवेदन तहसिलदार निवास ढाणे याना दिले .लग्न समारंभाशी निगडीत अनेक व्यवसाय सिझनल स्वरुपाचा आहे. हा व्यवहार हजारो लाखो लोकांना रोजगार देणारा आहे, कोरोना ची पहीली, दुसरी व तिस-या लाटे मुळे मंडप व्यवसाय हा आर्थिक संकटाच्या विळख्यात सापडुन अनेक व्यवसायिक बांधवांनी आत्महत्या केल्या आहेत, याबाबत वेळो-वेळी निवेदने दिले आहेत.
  आमचा व्यवसाय पुर्ण क्षमतेने अथवा जागेच्या ५०% आसन क्षमतेची परवानगी देण्यात यावी, अशी विनंती या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.


सभागृह आणि थियेटर पन्नास टक्के क्षमतेने चालू शकतात तर मंडप व्यवसाय का नाही असा ही सवाल मंडप व्यावसायिकांनी केला आहे .मंडप डेकोरेटर, मंगल कार्यालय, लॉन, बॅक्वेट हॉल ईत्यादी संबंधीत व्यवसाय वर जि.एस.टी हा 18% च्या ऐवजी 5% करावा
      लाईट बिला मधील फिक्स चार्ज कमी करण्यात यावे.  औद्योगीक वसाहती मध्ये गोडाउन करीता जागा उपलब्ध करुन द्यावे.
कर्जधारकांचे व्याज माफ करवे, मंडप डेकोरेटर, मंगल कार्यालय, लॉन, बॅनक्वेट हॉल ईत्यादी संबंधीत व्यवसायाला लावण्यात आलेल्या  सर्व करात सुट मिळावी अशा मागण्या करण्यात आल्या.यावेळी मंडप व्यावसायिक संघटनेचे तालुक्यातील सर्व पदाधिकारी आणि व्यावसायिक उपस्थित होते.


◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆






◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆