BANNER

The Janshakti News

पलुस : पाटोळे गल्ली येथील प्रलंबित असणाऱ्या गटारीचा प्रश्न तातडीने सोडवा - सागर सुतार.



पलुस : पाटोळे गल्ली येथील प्रलंबित असणाऱ्या गटारीचा प्रश्न तातडीने सोडवा - सागर सुतार.

-------------------------------------------------------------------
           सामान्य जनतेचा बुलंद आवाज....!
संपादक - भाऊसाहेब रुपटक्के.
--------------------------------------------------------------------

पलुस | दि. २८/०१/२०२२

पलूस शहरातील प्रभाग क्रमांक ७ मधील पाटोळे गल्ली, ब्राह्मणपुरी येथील जाधव सर यांच्या घरापासून ते प्रदीप जाधव यांच्या घरापर्यंत बांधीव गटार आहे. ही गटार जवळपास १६ वर्षांपूर्वीची असून या गटारीची बिकट अवस्था झाली आहे. या गटारी चा तळ पूर्णपणे खराब झालेला असून ठीक ठिकाणी खड्डे पडलेले आहेत. या पडलेल्या खड्ड्यांमुळे घाण व सांडपाणी कायमस्वरूपी साठून राहत आहे. या गटारी शेजारी जवळपास दहा ते बारा कुटुंब वास्तव्यास असून त्यांच्या घरी लहान बालके सुद्धा आहेत. 

 महाराष्ट्र राज्यात कोरोना या रोगाने पुन्हा थैमान घातले असून पलूस शहरात रुग्णांची संख्या वाढत आहे. त्याच बरोबर पलूस शहरांमध्ये डेंग्यूचेहि प्रमाण वाढलेले आहे. 

या सर्व गोष्टी स्थानिक नगरसेवकास वेळोवेळी सांगूनही त्यांनी आश्‍वासने देण्यास शिवाय काहीही केलेले नाही. तरी आपण या ठिकाणी भेट देऊन या बऱ्याच वर्षापासून प्रलंबित असणाऱ्या गटारीचा प्रश्न तातडीने सोडवून नागरिकांचे आरोग्य धोक्यात जाण्यापासून वाचवावे अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष सागर सुतार, अनिकेत माने व राहुल पाटोळे यांनी पलूस नगरपरिषदेच्या बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता श्री प्रतीक निकम साहेब यांच्याकडे केली.










◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆



◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆