सांगली, दि. 13, (जि. मा. का.) : विधानपरिषद सभापती मा.ना.प्रा.राम शिंदे हे बुधवार, दिनांक 14 मे 2025 रोजी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्या दौऱ्याचा सविस्तर कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
बुधवार, दिनांक 14 मे रोजी सकाळी 10.30 वाजता श्री. बिरोबा मंदीर, खटाव रस्ता, नांद्रे, ता. मिरज येथे आगमन व श्री. बिरोबा मंदीर वास्तुशांत, मुर्ती प्राणप्रतिष्ठापणा व कलशारोहण सोहळ्यास उपस्थिती. दुपारी 12 वाजता नांद्रे ता. मिरज येथून वाहनाने कोल्हापूर विमानतळकडे प्रयाण.
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰