सांगली, दि. 27 (जि. मा. का.) : इयत्ता 3 री ते 12 वी इयत्तांचा पाठ्यक्रम तयार करण्यासाठी मार्गदर्शक, राज्य अभ्यासक्रम आराखडा (शालेय शिक्षण)- 2024 मसुदा राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे यांच्यामार्फत तयार करण्यात आला आहे. हा मसुदा परिषदेच्या https://www.maa.ac.in या संकेतस्थळावर जनतेच्या प्रतिक्रियांसाठी दि 23 मे पासून खुला करण्यात आला आहे.
राज्य अभ्यासक्रम आराखडा (शालेय शिक्षण)- 2024 मसुद्याबाबत सर्व समाज घटक, शिक्षक, पालक, शिक्षण तज्ज्ञ, शैक्षणिक प्रशासन यांनी आपले अभिप्राय दिनांक 3 जून 2024 पर्यंत परिषदेच्या https://forms.gle/TDHL९z८harzRgJoy५ या लिंक वर नोंदवावेत अथवा पोस्टाने पाठवावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. अभिप्राय नोंदवत असतांना त्यामध्ये आपले नाव, मोबाइल क्रमांक, इमेल, पत्ता, कार्यालय, जिल्हा आदी तपशील देण्यात यावा. अभिप्राय व सूचना सप्रमाण व सकारण नोंदविल्या जाव्यात. त्यामध्ये क्षेत्र, विषय, स्तर, पृष्ठ क्रमांक, मूळ मसुद्यातील तपशील, आवश्यक बदल, बदलाचे कारण, कोणत्या मुद्द्यामध्ये दुरुस्ती आवश्यक वाटते याचा तपशील, सुधारित मजकूर कसा असावा, याचा समावेश असावा.
तसेच पोस्टाने अभिप्राय पाठवणार असल्यास त्याबर SCF-SE राज्य अभ्यासक्रम आराखडा (शालेय शिक्षण)- 2024 बाबत अभिप्राय (अभ्यासक्रम विकसन विभागासाठी) असे ठळक अक्षरात लिहून पाठवावेत, असे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहुल रेखावार यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Youtube Link
👇
https://youtube.com/@thejanshakatinews5707
Portal Link
👇
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖