BANNER

The Janshakti News

कृष्णा कालव्याचे उन्हाळी आवर्तन सुरळीतपणे पार पाडण्यासाठी मनाई आदेश जारी


 

        सांगली, दि. 10, (जि. मा. का.) : कृष्णा कालव्याव्दारे सांगली जिल्ह्याकरीता उन्हाळी हंगामातील सिंचन आवर्तन दि. 29 मार्च 2024 पासून चालू आहे. कृष्णा कालव्याचे उन्हाळी आवर्तन सुरळीतपणे पार पाडण्याकरिता व सर्व लाभधारकांना सम प्रमाणात पाणी वाटप होण्याकरिता जिल्हादंडाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये प्राप्त अधिकारानुसार सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील किल्ले मच्छिंद्रगड, कोळे, नार्सिंह पूर, शिरटे, येडे मच्छिंद्र, रेठरे हरणाक्ष, बिचूद, दुधारी, ताकारी, पलूस तालुक्यातील तुपारी, दह्यारी, घोगाव, कुंडल, दुधोंडी, नागराळे, बुर्ली, सावंतपूर, पलूस, गोंदीलवाडी, आमणापूर व तासगाव तालुक्यातील येळावी, वसगडे या गावांमध्ये कालव्या लगतच्या दोन्ही काठापासून 200 मीटर अंतरावर दि. 11 एप्रिल रोजीचे 00.01 वाजल्यापासून ते दिनांक 7 मे 2024 रोजीचे 23.59 वाजेपर्यंत दोन किंवा त्यापेक्षा जास्त लोकांनी फिरण्यास तसेच एकत्रित गटागटाने फिरणे व उभा राहण्यास मनाई केली आहे. 

        हा आदेश कायदेशीर कर्तव्य बजावित असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना व धार्मिक विधी यांना लागू राहणार नाही.

हेही पहा ----


◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆