BANNER

The Janshakti News

बेपत्ता : घरात कोणास काहीही न सांगता ३० वर्षाचा युवक घरसोडून निघून गेला.... इस्लामपूर पोलीस ठाण्यात बेपत्ता झालेल्या युवकाच्या आईने केली तक्रार दाखल....बेपत्ता : घरात कोणास काहीही न सांगता ३० वर्षाचा युवक घरसोडून  निघून गेला.... 

    इस्लामपूर पोलीस ठाण्यात बेपत्ता झालेल्या युवकाच्या आईने केली तक्रार दाखल....

-------------------------------------------------------------------
 सामान्य जनतेचा बुलंद आवाज....!
संपादक - भाऊसाहेब रुपटक्के

---------------------------------------------------------------------

सांगली : वाळवा दि. 11/01/2022

 सांगली : वाळवा तालुक्यातील नवेखेड येथील ३० वर्षीय युवक  घरात कोणालाही काहीही न सांगता घर सोडून कोठेतरी निघून गेला आहे.याबाबत बेपत्ता असलेल्या युवकाच्या आईने इस्लामपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

इस्लामपूर पोलीस ठाणे कडून मिळालेल्या माहितीनुसार दिनांक ६.१.२०२२ रोजी दुपारी २.०० वा. सुमारास संतोष पांडुरंग पवार वय ३० वर्षे रा.नवेखेड ता. वाळवा जिल्हा सांगली हा युवक त्याच्या राहते घरातुन नवेखेड येथुन घरात कोणास काही एक न सांगता कोठेतरी निघून गेला. बराच वेळ झाला परत आला नाही म्हणून त्याच्या आई-वडिलांनी घराचे आजुबाजुला तसेच एस. टी. स्टॅन्ड परीसर, पै-पाहुणे नातेवाईक यांचेकडे शोध घेतला परंतु तो अदयाप पर्यंत मिळून आला नाही. तरी त्याचा शोध व्हावा म्हणून घर सोडून गेलेल्या युवकाची आई  सौ. मंगल पांडुरंग पवार वय ४५ वर्षे यांनी  दि. १०/०१/२०२२ रोजी  मुलगा संतोष पांडुरंग पवार हा बेपत्ता असलेबाबत इस्लामपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पुढील तपास इस्लामपूर पोलीस करीत आहेत.


बेपत्ता असलेल्या युवकाचे वर्णन...
नांच संतोष पांडुरंग पवार चय उंची ५ फुट ५ इंच बांधा सडपातळ, नाक लांच, रंगाने ३० वर्षे, सावळा, केस काळे, अंगात पांढरे रंगाचा शर्ट, काळे रंगाची पॅन्ट, उजचे बाजुस ओठाजवळ तिळ, मराठी भाषा बोलतो.

■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■
■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■