BANNER

The Janshakti News

भिलवडी येथील महावितरण शाखेचा गलथान कारभार... घरावरून गेलेल्या विद्युत तारेमुळे साखरवाडी येथील नागरिकांचा जीव धोक्यात... नागरिकांनी दिला आंदोलनाचा इशारा...



भिलवडी येथील महावितरण शाखेचा गलथान कारभार...

घरावरून गेलेल्या विद्युत तारेमुळे साखरवाडी येथील नागरिकांचा जीव धोक्यात...

नागरिकांनी दिला आंदोलनाचा इशारा...



------------------------------------------------------

संपादक - भाऊसाहेब रुपटक्के 

------------------------------------------------------

भिलवडी | दि. 15 / 12 / 2021

भिलवडी ता. पलूस :  साखरवाडी येथील नागरिकांच्या घरावरून विद्युत तारा गेल्या असल्यामुळे येथील नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे.  विद्युत महावितरण  शाखा भिलवडी यांच्याकडे  नागरिकांनी गेल्या सहा महिन्यापूर्वी लेखी तक्रार दिली होती.


 येथील नागरिकांनी  अनेक वेळा महावितरण अधिकारी व लाईन मन यांच्याशी संपर्क केला असता त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे मिळाल्यामुळे व जाणून बुजून सदर गंभीर बाबीकडे दुर्लक्ष केल्यामुळे साखरवाडी येथील नागरिकांनी ग्रामपंचायत भिलवडी यांच्याकडे धाव घेऊन तक्रार देण्यात आली. भिलवडी ग्रामपंचायतीने  महावितरण शाखा भिलवडी यांना तात्काळ पत्रव्यवहार करून सदर समस्येवरती तात्काळ नियोजन करण्याचे लेखी पत्र 29 मे 2021 रोजी दिले. परंतु साखरवाडी येथील नागरिकांनी लेखी निवेदनाद्वारे तक्रार करून व भिलवडी ग्रामपंचायतीने विद्युत महावितरण शाखेला लेखी पत्रव्यवहार करून आज जवळजवळ सहा महिने झाले तरीदेखील महावितरण शाखेचे  संबंधित अधिकारी व लाईनमन यांना कोणतेही गांभीर्य नसल्याचे दिसून येत असल्यामुळे व महावितरण शाखा भिलवडी यांच्या गलथान कारभारामुळे येथील नागरिकांनी  आठ दिवसांमध्ये सदर घरावरील विद्युत तारेचे  योग्य नियोजन नाही केल्यास भिलवडी येथील विद्युत महावितरण शाखेच्या विरोधात तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा साखरवाडी येथील नागरिकांनी दिला आहे. 


यावेळी सलीम फकीर , सादिक फकीर , मोसीन फकिर , जुबेर मुल्ला , मेहेरअल्ली फकीर , निजाम फकीर , बाबासो इनामदार , उपस्थित होते.