yuva MAharashtra राज्यस्तरीय गणेशोत्सव स्पर्धेत सांगली जिल्ह्याचा डंका

राज्यस्तरीय गणेशोत्सव स्पर्धेत सांगली जिल्ह्याचा डंका


येडेनिपाणीचे मोरया गणेश मंडळ राज्यात प्रथम

 

-        जिल्हास्तरावर विट्याचे तिरंगा गणेशोत्सव मंडळ द्वितीय, तर खरसुंडीच्या नाथ युवा असोसिएशनची तृतीय क्रमांकावर बाजी




 

        सांगली, दि. 15 (जि.मा.का.) : महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धा २०२६ मध्ये सांगली जिल्ह्याने राज्यस्तरावर उल्लेखनीय यश मिळवले आहे. वाळवा तालुक्यातील येडेनिपाणी येथील मोरया गणेश मंडळाने राज्यस्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावत सांगली जिल्ह्याचा नावलौकिक वाढवला आहे. खानापूर तालुक्यातील विटा येथील तिरंगा गणेशोत्सव मंडळाने जिल्हास्तरावर द्वितीय, तर आटपाडी तालुक्यातील खरसुंडी येथील नाथ युवा असोसिएशनने तृतीय क्रमांक मिळवला आहे. राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाने १५ ऑक्टोबर रोजी जाहीर केलेल्या शासन निर्णयातून या विजेत्या मंडळांची नावे घोषित केली आहेत.

 

            महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत गणेशोत्सव हा राज्य महोत्सव म्हणून साजरा करताना उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. १४ ते २५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत पार पडलेल्या या स्पर्धेत आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय आणि तालुकास्तरीय अशा विविध स्तरांवर विजेत्या मंडळांची निवड करण्यात आली. राज्य शासनाने एकूण १४१ विजेत्या मंडळांची नावे जाहीर केली आहेत.

 

जिल्ह्यातील तीन मंडळांचा गौरव

 

            या स्पर्धेत येडेनिपाणीच्या मोरया गणेश मंडळाने राज्यस्तरावर प्रथम क्रमांक मिळवत सांगली जिल्ह्याला विशेष यश मिळवून दिले. जिल्हास्तरीय निकालातही मोरया गणेश मंडळाने प्रथम क्रमांक मिळवला आहे. विटा येथील तिरंगा गणेशोत्सव मंडळाने द्वितीय, तर खरसुंडी येथील नाथ युवा असोसिएशनने तृतीय क्रमांक पटकावला आहे.

 

उद्या मुंबईत पारितोषिक वितरण

 

            सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धा २०२६ मधील विजेत्या मंडळांचा पारितोषिक वितरण समारंभ शुक्रवार, दि. १६ ऑक्टोबर २०२६ रोजी मुंबईतील प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिरात आयोजित करण्यात येणार आहे. या समारंभात विजेत्या मंडळांना पारितोषिक वितरण करण्यात येणार आहे.


 🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰





🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰

𝗟𝗶𝗻𝗸𝘀

YouTube Channel

🌐 https://youtube.com/@thejanshakatinews5707

News Portal

🌐 www.theJanShaktiNews.in

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰